राज्याला आजपासून 'अवकाळी' चा फटका; हवामान विभागाने वर्तवली शक्यता.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

राज्याला आजपासून 'अवकाळी' चा फटका; हवामान विभागाने वर्तवली शक्यता.!

दि. 22.01.2024

Vidarbha News India 

Maharashtra Weather Update : राज्याला आजपासून 'अवकाळी' चा फटका;  हवामान विभागाने वर्तवली शक्यता.! 

विदर्भ न्यूज इंडिया 

मुंबई : बांगलादेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता आयएमडी हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईमध्ये पहाटे थंडीचा कडाका वाढला आहे.

तर राज्यातील नाशिक आणि निफाडच्या तामानात कमालीची घट झालेलीआहे, तर विदर्भात आणि मराठवाडातील तापमानातही घट झाली आहे. यामुळे राज्यातील पुढील तीन दिवस काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यात वर्तवली आहेत.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीकांवर मोठा परिणा होणार आहे. राज्यात 22, 23 आणि 24 जानेवारीला विदर्भातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भात आज पावसाच्या हलक्या सरी बरसणार आहेत. राज्यात 48 तासात उत्तर भारतात दाट धुके पडण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवली आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाडा कायम

उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. पंजाब, त्रिपुराच्या हरियाणा, चंदीगड, राजस्थान आणि पश्चिम बंगालच्या काही भागातील धुक्याची चादर यला मिळत आहे. 22 आणि 23 जानेवारीदरम्यान मध्य प्रदेशातील काही भागात थंडी वाढण्याचा अंदाज वर्तवली आहे. तसेच देशातील 23 आणि 25 जानेवारी देशभरातील विविध भागात थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाजही आयएमडीने वर्तवली आहे.



Share News

copylock

Post Top Ad

-->