गडचिरोली पोलीस दल व कृषी महाविद्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यामाने कुक्कुटपालन व बदकपालन प्रशिक्षणाचा निरोप समारंभ.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोली पोलीस दल व कृषी महाविद्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यामाने कुक्कुटपालन व बदकपालन प्रशिक्षणाचा निरोप समारंभ.!

दि. 6 जानेवारी 2024 
Vidarbha News India 
गडचिरोली पोलीस दल व कृषी महाविद्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यामाने कुक्कुटपालन व बदकपालन प्रशिक्षणाचा निरोप समारंभ.!
-  3 दिवसीय कुक्कुटपालन व बदकपालन प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.!
- प्रोजेक्ट उडान अंतर्गत 85 प्रशिक्षनार्थ्यांना बदकपालन व कुक्कुटपालन पक्षी, खादय व इतर साहित्याचे वितरण.!
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्रातील शेतक­यांची आर्थिक उन्नती होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने “प्रोजेक्ट उडान” अंतर्गत गडचिरोली जिल्हयातील युवक - युवतीसाठी रोजगार निर्मीतीकरीता विविध उपक्रम राबविण्यात जातात. याचाच एक भाग म्हणुन मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांचे मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्रातील माओवादग्रस्त क्षेत्रातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींना गडचिरोली पोलीस दल व कृषी महाविदयालय यांच्या संयुक्त सहकार्याने इच्छुक युवक-युवतींना 03 दिवसीय कुक्कुटपालन व बदकपालन प्रशिक्षण देण्यात आले. सदरचे दोन्ही प्रशिक्षण यशस्वीरीत्या पुर्ण केलेल्या प्रशिक्षनर्थांचा निरोप संमारंभ कार्यक्रम आज दिनांक 06/01/2024 रोजी पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे पार पडला.
गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने बदकपालन व कुक्कुटपालन प्रशिक्षणामध्ये उपविभाग गडचिरोली, पेंढरी, कुरखेडा व धानोरा येथील 85 प्रशिक्षणार्थ्यानी सहभाग घेतला होता. दिनांक 04/01/2024 ते 06/01/2024 पर्यंत एकुण 03 दिवसाच्या या प्रशिक्षणात तज्ञांच्या मार्फतीने बदक व कुक्कुटांच्या चारा व्यवस्थापन व लसीकरण संदर्भात प्रशिक्षण व उद्बोधन करुन, बदकपालन व कुक्कुटपालन व्यवसाय उभारणेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थ्यानी आकापूर, ता. मुल, जि. चंद्रपूर येथील पोल्ट्री फार्म तसेच बदक पैदास केंद्र, वडसा जि. गडचिरोली येथे भेट दिली.  दोन्ही प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केलेल्या प्रशिक्षनार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.  त्यानंतर बदकपालन व कुक्कुटपालन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षनार्थ्यांना व्यवसाय सुरु करण्याकरिता प्रत्येकी 25 बदकाचे व कोंबडीचे पिल्ले, प्रत्येकी 10 किलो प्रमाणे खाद्य व इतर साहित्य वाटप करुन सर्व प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.  यावेळी मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा. यांनी आपल्या मार्गदर्शंनपर भाषणात सांगितले की, कुक्कुटपालन व बदक पालन हा व्यवसाय शेतीला पूरक म्हणून शेतक­यांनी केला पाहिजे. तसेच धानाचे पिकासोबतच इतर नगदी पिके घ्यावी व गडचिरोली पोलीस दलाच्या कृषी दर्शन सहलीच्या माध्यमातून विविध ठिकाणच्या भेटीदरम्यान घेतलेल्या अनुभवांचा फायदा घेऊन त्यांनी आपली आर्थीक प्रगती करावी.    
सदर निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा. तसेच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे मुख्य नियंत्रक डॉ. प्रमोद पाटील, कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोलीचे विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) डॉ. विक्रम कदम, सहा. प्राध्यापक (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) डॉ. सचिन रामटेके, डॉ. महातळे व डॉ. खोब्राागडे हे उपस्थित होते. 
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे सर्व अधिकारी/अंमलदार, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धंनजय पाटील, पोउपनि भारत निकाळजे, पोउपनि चंद्रकांत शेळके व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Share News

copylock

Post Top Ad

-->