दि. 26.01.2024
आमदार डॉ. देवराव होळी यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात केले ध्वजारोहण.!
- प्रजासत्ताक दिनाच्या दिल्या समस्त जनतेला शुभेच्छा.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/चामोर्शी : २६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
लोकशाही म्हणजे लोकांचे,लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य. या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला.
आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये ध्वजारोहण केले या दरम्यान त्यांनी प्रतिपादन केले. व प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा वासियांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, भाजपा जेष्ठ नेते जयराम चलाख, युवा मोर्चाचे प्रतीक राठी, महामंत्री रामचंद्र वरवाडे, कार्यालयीन सुनील सोरते यांचे सह मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.