Gadchiroli : धावत्या एसटी बसचे एक्सल तुटले.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

Gadchiroli : धावत्या एसटी बसचे एक्सल तुटले.!

दि. 30.01.2024 

Vidarbha News India 

Gadchiroli : धावत्या एसटी बसचे एक्सल तुटले.! 

विदर्भ न्यूज इंडिया 

गडचिरोली :  गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी स्थानकाहून निघालेल्या प्रवासी बसचे एक्सल तुटल्याची घटना आज, मंगळवारी दुपारी 12.30 वाजता घडली.

चालकाने प्रसंगावधान राखत वेळच बस नियंत्रणात आणून थांबवल्यामुळे बसमधील 25 प्रवासी सुखरूप बचावले.

यासंदर्भातील माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्याच्य अहेरी बस आगारातून सिरोंचा मार्गाने निघालेल्या मानव विकास मिशनच्या बसचे एक्सल उमानूर पहाडीवर तुटले. ही बाब वेळीच चालकाच्या लक्षात आली व त्याने बस जागीच रोखली सुदैवाने अपघात टळला व बसमधील 25 प्रवासी बालंबाल बचावले. ही घटना मंगळवारी दुपारी 12.30 वाजता सिरोंचा पासून 32 किमी अंतरावर घडली. अहेरी- आसरअल्ली- सिरोंचा ही बस मंगळवारी सकाळी 9.30 वाजता अहेरीवरून निघाली. ही बस अहेरी, सिरोंचा व त्यानंतर आसरअल्लीला जाते. या बसमध्ये बहुसंख्य प्रवासी होते. हा मार्ग खड्डेमय असल्याने या मार्गाने नागरिकांना बसमधून प्रवास करताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. त्यातच मंगळवारी मानव विकास मिशनची बस उमानूर पहाडीवर आली असता, अचानक बसचे एक्सल तुटले.ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने बस थांबवली. बस सुरूच राहिली असती तर ती उलटण्याचा धोका होता. चालकाने बस जागीच थांबविल्याने प्रवासी बसमधून खाली उतरले. त्यानंतर प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली.

 

Share News

copylock

Post Top Ad

-->