दि. 4 जानेवारी 2024
केवळरामजी हरडे कृषि महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/ चामोर्शी : केवळरामजी हरडे कृषि महाविद्यालय चामोर्शी येथे दिनांक 03 जानेवारी 2024 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदित्य कदम होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सहा. प्राध्यापक तुषार भांडारकर, भोजराज कुमरे, छबील दूधबळे, श्रीकांत सरदारे, किशोर गहाणे, पवन बुधबावरे, तुषार पाकवार, प्रलय झाडे, धम्मदीप वासनिक, महेंद्रकूमार लिल्हारे, अमोल डोंगरवार, तुलसीदास बारस्कर, तसेच सहा. प्राध्यापिका डॉ. रेखा समरीत, डॉ. शुभांगी मरस्कोले, कु. उषा गजभीये, कु. निखिता येलमुले, सौ. पौर्णिमा सालेकर आदी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण व दिप प्रज्वलनाने करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात डॉ. आदित्य कदम यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले ह्या भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी होत्या. त्या भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या तसेच सर्व स्त्रियांना प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या एकमेव महिला होत्या, असे त्यांनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहूण्यांमध्ये रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी श्री. प्रलय झाडे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, सावित्रीबाई फुले यांनी अनेक अडचणींवर मात करत स्त्री शिक्षणाचा पाया रचला व पहिल्या भारतीय स्त्री शिक्षिका बनल्या व इतर स्त्रियांना ते एक प्रेरणास्थान ठरून आज जो सन्मान स्त्रियांना मिळत आहे तो सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रलय झाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी श्याम भैसारे, देवराव ठाकरे, यशवंत भरणे, अनिल घोंगडे, गजानन पेशट्टीवार, सचिन भांडेकर, सूरज बावणे, विजय किरमे यांनी परिश्रम घेतले.