दि. 08 जानेवारी 2024
Vidarbha News India
९ जानेवारी रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महिला सशक्तिकरण अभियान.!
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी / गडचिरोली : ९ जानेवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात गडचिरोली येथे होत आहे. या अभियानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती राहणार आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११.०० वा. एमआयडीसी मैदान, कोटगल रोड, गडचिरोली येथे होत आहे.
यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, उद्योग मंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. यावेळी विविध विकास कामांचे भुमिपुजन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
या विकासकामांचे होणार लोकार्पण व भूमीपूजन :
१०० मोबाईल टॉवर, प्राथमिक आरोग्य पथक (ग्यारापत्ती), मानव विकास मिशन अंतर्गत ०८ एकल गोडाऊन (आंबेझरी, कांदाळी, राजगोपालपूर, डार्ली, नरोटीचक, धोडराज, होड्री व गोंगवाडा), एकल सेंटर (मौजा- मेंढा ता. धानोरा, एकल सेंटर मो. कुरुड ता. देसाईगंज), आदिवासी विभागाचे शाळा व वसतिगृह, तलाव सौदर्यींकरण, नगर परिषद प्रशासकीय इमारत, चामोर्शी तालुका क्रिडांगण, धानोरा तालुका क्रिडांगण, चामोर्शी नगर पंचायत प्रशासकीय भवन, वघाडा-सायगाव-शिवणी-डोंगरगाव मोठया पुलाचे बांधकाम करणे (ता. आरमोरी), चोप-तमाशीटोला ते वडसा मोठया पुलाचे बांधकाम करणे. (ता. वडसा) सानगडी-गोठणगाव-कुरखेडा-मालेवाडा-रामा-मोठया पुलाचे बांधकाम करणे (ता. धानोरा), सानगडी- गोठणगाव-कुरखेडा-मालेवाडा-रामा-ची सुधारणा करणे (ता. कुरखेडा), मौशीखांब-वडधा-शंकरपूर-कोरेगाव रस्ता ची रुंदीकरणासह सुधारणा करणे. (ता. वडसा), मोशीखांब-वडधा-शंकरपूर-कोरेगाव रस्ता सुधारणा करणे (ता. वडस, वडसा-नैनपुर-कोकडी रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे (ता. वडसा), कुरखेडा-वैरागड रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (ता. आरमोरी) मौशीखांब- वैरागड-पळसगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (ता. आरमोरी), मौशीखांब- वैरागड-पळसगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (ता. आरमोरी), वडधा- सायगाव-शिवणी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (ता. आरमोर, NH-३५३ C शिवराजपुर- उसेगाव- मोहटोला किन्हाळा रस्ता दजोन्नोती करणे (ता. वडसा), MRL-0१- आमगाव-गांधीनगर रस्ता दजोन्नोती करणे (ता. वडसा), दवंडी-रांगी रस्ता दजोन्नोती करणे (ता. आरमोरी), कुलकुली- अंगारा रस्ता दजोन्नोती करणे (ता. आरमोरी), भांसी-माजिटोला रस्ता दजोन्नती करणे (ता. आरमोरी),डोंगरमेन्ढा रस्ता दजोन्नती करणे (ता. आरमोरी), मार्कण्डा देव पुननिर्माण कार्य,मार्कण्डा देवस्थान नुतनीकरण कार्य (राज्य शासन), चपराळा देवस्थान (ता. चामोर्शी) पर्यटन विकास (अरतोंडी) पर्यटन विकास (कलापूर) पर्यटन स्थळ विकास (ता. अहेरी) रामदेगी (ता. चिमूर) पर्यटन स्थळ विकास, (सोमनूर) पर्यटन स्थळ ता. (सिरोंचा), कचार गड तिर्थ क्षेत्र विकास (ता. सालेकसा जि. गोंदिया) गडचिरोली तलाव सौदर्यीकरण, नगरपरिषद प्रशासकीय इमारत.