दुचाकीची रोडच्या लोखंडी सुरक्षा कठड्याला जबर धडक, जावई सासऱ्याच्या पायाचा पडला तुकडा.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

दुचाकीची रोडच्या लोखंडी सुरक्षा कठड्याला जबर धडक, जावई सासऱ्याच्या पायाचा पडला तुकडा.!

दि. 2 जानेवारी 2024
Vidarbha News India 
दुचाकीची रोडच्या लोखंडी सुरक्षा कठड्याला जबर धडक, जावई सासऱ्याच्या पायाचा पडला तुकडा.! 
विदर्भ न्यूज इंडिया 
प्रतिनिधी/गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील आष्टी - चामोर्शी मार्गांवरील उमरी जवळील पुलाच्या लोखंडी सुरक्षा कठड्याला दुचाकीची जबर धडक बसली या धडकेत दुचाकीस्वार जावयासह सासरा गंभीर घायाळ झाल्याची घटना आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.
संदिप तुळशीराम पोटे वय 42 वर्ष रा. मुरखळा ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली परशूराम बालाजी ठाकूर वय 65 वर्ष रा. बल्लू ता. चामोर्शी असे गंभीर जखमीची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे की मुरखळा येथील संदीप पोटे हा आपल्या सासरे परशूराम ठाकूर यांना घेउन दुचाकी क्रमांक MH 33 AB 0655 ने तेलंगणातील सिरपुर येथे शेतीची किटकनाशके खरेदी करण्यासाठी गेले तिथून गावाकडे परत जात असताना आष्टी चामोर्शी मार्गावरील उमरजवळील पुलाच्या लोखंडी सुरक्षा कठड्याला दुचाकीची जबर धडक बसली ही धडक इतकी भीषण होती की यात दुचाकीस्वार जावई संदिप पोटे यांच्या दोन्ही पायाचा अर्धा तुकडाच पडला तर सासरे परशूराम ठाकूर यांचा एक पाय चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे पोलीस उपनिरिक्षक गणेश जंगले हे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले व जखमीना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर दोन्हीं जखमींना चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस करीत आहेत.

Share News

copylock

Post Top Ad

-->