केंद्र सरकारच्या नव्या कायद्यामुळे आक्रमक होऊन ट्रकचालकांनी पोलिसांना केली मारहाण.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

केंद्र सरकारच्या नव्या कायद्यामुळे आक्रमक होऊन ट्रकचालकांनी पोलिसांना केली मारहाण.!

दि. 1 जानेवारी 2024 

Vidarbha News India 

Maharashtra : Mumbai : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यामुळे आक्रमक होऊन ट्रकचालकांनी पोलिसांना केली मारहाण.! Big Breaking News

विदर्भ न्यूज इंडिया 

मुंबई : केंद्र सरकारने पारित केलेल्या मोटार वाहन कायद्याला देशभरातून मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. महाराष्ट्रातही (Navi Mumbai) ठिकठिकाणी ट्रकचालकांनी बंद पुकारला आहे.

नवी मुंबईमध्ये ट्रकचालकांच्या आंदोलनाने हिसंक वळण घेतल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये आंदोलकांनी पोलिसांवरच हल्ला चढवला आहे. जमावाने पोलिसावर लाठ्या काठ्याने हल्ला केला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
नवी मुंबईजवळच्या महामार्गावर हा सगळा प्रकार घडला आहे. या व्हिडीओमध्ये एका पोलिसाला आंदोलकांनी घेरलं आहे. मारो…मारो पोलीसवाले को मारो, असं या व्हिडीओमध्ये जमाव म्हणत असून लाठ्या काठ्या घेऊन पोलिसाच्या अंगावर धावून गेले आहे. संतप्त जमावाला पाहून पोलीस कर्मचाऱ्याने आपला जीव वाचवण्यासाठी घातस्थळावरून पळ काढला. आंदोलक ट्रक चालकांनी यावेळी गाड्यांवर दगडफेक करत तोडफोडसुद्धा केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.viral video

केंद्र सरकारच्या नव्या कायद्यामुळे आक्रमक होऊन ट्रकचालकांनी पोलिसांना केली मारहाण

काय आहे नेमका कायदा?
अपघातास जबाबदार ट्रकचालकास सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे. याच कायद्याला विरोध म्हणून आजपासून महाराष्ट्रासह देश भारतील सर्वच ट्रक चालक संपावर गेले आहेत आहे. आजपासून तीन दिवसांचा संप आहे. त्याचाच परिणाम म्हणून ट्रक चालक रस्त्यावर उतरले असून रस्ता रोको केला आहे.

🔷 खाली क्लिक करून व्हिडिओ बघा 👇


Share News

copylock

Post Top Ad

-->