Vidarbha News India
चामोर्शी पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेला आपल्या समस्या घेऊन उपस्थित रहा.!
- आमदार डॉ. देवराव होळी यांचे जनतेला आवाहन.!
- चामोर्शी पंचायत समितीची २२ फेब्रुवारी रोजी वार्षिक आमसभा.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/ चामोर्शी : आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ रोजी चामोर्शी पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेचे आयोजन करण्यात आले असून या आमसभेला तालुक्यातील नागरिकांनी आपल्या लेखी समस्यांसह उपस्थित रहावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी या माध्यमातून केले आहे.
ही आमसभा चामोर्शी पंचायत समितीच्या आवारात सकाळी ११ वाजता सुरू करण्यात येईल जनतेने आपल्या समस्या या आमसभेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे व आपल्या समस्यांचे एक लेखी निवेदन या आमसभेच्या प्रसंगी आणावे असे आवाहन त्यांनी या माध्यमातून केले आहे.