अखेर.! वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत दाखल.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

अखेर.! वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत दाखल.!

दि. 02 फेब्रुवारी 2024 

Vidarbha News India 

अखेर.! वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत दाखल.!

विदर्भ न्यूज इंडिया 

मुबंई : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर अखेर महाविकास आघाडीत दाखल. याबाबत महाविकास आघाडीच्या अधिकृत 'X' खात्यावर फोटोसह ट्वीट करत माहिती दिली आहे.

(Maharashtra Politics) अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीत दाखल झाल्यानंतर अनेक चर्चांना पुर्णविराम मिळाला.

Maharashtra Politics : अखेर चर्चांना पुर्णविराम मिळाला…

वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होणार की नाही याच्या चर्चा राजकीय वर्तुळासह सोशळ मीडियावर चर्चा रंगल्या होत्या. महाविकास आघाडीने एक फोटो शेअर करत जाहीर केले आहे की, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत दाखल होणार. महाविकास आघाडीने आपल्या 'X' खात्यावर फोटो शेअर करत म्हटलं आहे की, 'अखेर! अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत. वंचित बहुजन आघाडी हा आणखी एक सोबतीचा पक्ष आता शामील.' फोटोमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, ठाकरे गटाचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेसचे नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड दिसत आहेत.

संजय राऊत यांनी मंगळवार (दि.३०) रोजी ट्वीट करत म्हटलं होत की, ' वंचीत बहुजन आघाडीचा आज महविकास आघाडीत समावेश झाला. ॲड.बाळासाहेब आंबेडकर हे 2 फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होतील. वंचीत मुळे देशातील हुकूशाही विरोधी लढ्याला नक्कीच बळ मिळेल.भारताचे संविधान धोक्यात आहे. एकत्र येऊन संविधान वाचवावे लागेल.' या ट्वीटसह त्यांनी याबाबतचं महाविकास आघाडीने अधिकृत पत्र जारी केलं होतं.

या आघाडीची इंडिया आघाडी होवू नये

महाविकास आघाडीत दाखल झाल्यानंतर प्रथमच माध्यमांशी बोलत असताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 'अनेक विषयांवर चर्चा अजुन बाकी आहे. या आघाडीची इंडिया आघाडी होवू नये ही दक्षता घेतली जाणार'

Finally.! Vanchit Bahujan Aghadi Adv. Prakash Ambedkar joined Mahavikas Aghadi.



Share News

copylock

Post Top Ad

-->