दि. 1 फेब्रुवारी 2024
सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प;
- आमदार डॉ. देवराव होळी
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : केंद्र सरकारचा आजचा सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिली आहे.
या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राकरीता भरीव निधीची तरतूद, नवीन वैद्यकीय महाविद्यालय, मिशन इंद्रधनुष्य योजना, महिलांकरीता निःशुल्क सव्र्हायकल कॅन्सर लसीकरण, १ कोटी घरांना सौर उपकरण, गरीबांना ३०० युनिट पर्यंत मोफत वीज, लोकसंख्या नियंत्रण समिती स्थापन करणार, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकरीता योजना, गरिबांसाठी २ कोटी घरे, तीन कोटी महिलांना लखपती दीदी योजना, आशा वर्कर्सला आयुष्यमान योजनेचा लाभ, कृषी क्षेत्रात पीपीपी मॉडेल आणण्यासोबतच या अर्थ संकल्पात 'जय अनुसंधान' हा नारा भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट साध्य करू शकेल असा विश्वास आहे. नारीशक्ती, अन्नदाता शेतकरी, गरीब कल्याण, विकसित भारत, सर्वांगीण विकास साधणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प तसेच महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे.
A budget that promotes holistic development;
- MLA. Dr. Devrao Holi