Gadchiroli : शेतजमिन कंपनीला देण्याऱ्या दलालीखोरांना गावकऱ्यांनी दिला चोप.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Gadchiroli : शेतजमिन कंपनीला देण्याऱ्या दलालीखोरांना गावकऱ्यांनी दिला चोप.!

दि. 06 मार्च 2024

Vidarbha News India 

Gadchiroli : शेतजमिन कंपनीला देण्याऱ्या दलालीखोरांना गावकऱ्यांनी दिला चोप.!

विदर्भ न्यूज इंडिया 

गडचिरोली/चामोर्शी : Farm land brokers कोनसरी परिसरात उद्योग उभारणीसाठी सुपीक जमीन देण्यासाठी नागरिकांचा विरोध असतानाही काही दलाल सक्रिय होऊन लहान मोठ्या शेतकर्‍यांना हेरून जमिनी कंपनीला देण्यासाठी गावागावात फिरत आहेत.

असेच सोमनपल्ली गावात दलाली करण्यासाठी आलेल्या तिघांना गावकर्‍यांनी चांगलाच चोप दिला आहे.

दलाली करणार्‍यांमध्ये चाणाक्ष डोनुजी संदुकवार रा. आलापल्ली, आंबोली येथील सेवानिवृत्त ग्रामसेवक अरुण विठ्ठल उंदिरवाडे व शिवराम नारायण बारसागडे रा. चामोर्शी या तिघांचा समावेश आहे.चामोर्शी तालुक्यातील लोहखनिज उद्योगाकरिता कोनसरी लगतच्या गावखेड्यातील शेतजमिनी उद्योगाकरिता शासन हस्तगत करुन मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकार्‍यांना महिलांनी याअगोदर रिकाम्या हाताने पाठविल्याच्या घटना घडल्या आहेत. उद्योगांसाठी जमीन दिल्यावर आम्ही जायचे कुठे? जगायचे कसे? आमचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. भूसंपादनावरून शेतकर्‍यांमध्ये खदखद व्यक्त होत आहे. विकासाला आमचा विरोध नाही. लोह खनिजावर आधारित उद्योगांमुळे जिल्ह्याची ओळख बदलत आहे.farm land brokers मात्र यासाठी जर आमची सुपीक शेतजमीन सरकार घेणार असेल तर आम्ही कुठे जायचे, असा प्रश्‍न चामोर्शी तालुक्यातील शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे. या परिसरात उद्योगाकरिता प्रशासन मोठ्या प्रमाणात भूसंपादन करणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतजमिनी उद्योगासाठी दिल्यास आम्ही कुठे जायचे व जगायचे कसे असा प्रश्‍न ते उपस्थित करीत आहेत. गावकर्‍यांची असे मत असताना लॉयड्स मेटल कंपनीचे काही दलाल जमिनी कंपनीला देण्यासाठी दलाली करीत असल्याचे बोलल्या जात होते. अखेर मंगळवारी सोमनपल्ली येथे जमीन देण्यासाठी दलाली करणार्‍या तिघांना पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर समज देऊन सोडून देण्यात आले. यापुढे दलालांनी गावात पाय ठेवल्यास परिणाम खूप वाईट होतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.



Share News

copylock

Post Top Ad

-->