दि. 22 मार्च 2024
Vidarbha News India
एका कट्टर जनमिलिशियास गडचिरोली पोलिसांनी केली अटक.!Gadchiroli police
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : माहे फेब्रुवारी ते माहे मे दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ.देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमी पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास काल दिनांक 21/03/2024 रोजी अटक केले.
काल दिनांक 21/03/2024 रोजी उपविभाग भामरागड हद्दीमध्ये भामरागड क्युआरटी, पोस्टे भामरागड पार्टी व सिआरपीएफचे जवान पोस्ट परिसरातंर्गत नाकाबंदी करीत असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड सा. यांना मिळालेल्या गोपनिय माहिती मिळाली की, नाकाबंदी ठिकाणाच्या आसपास एक व्यक्ती संशयीतरित्या वावरत असतांना दिसून आला आहे. त्यावरुन त्यास ताब्यात घेऊन अधिक सखोल चौकशी केली असता, त्याचे नाव पेका मादी पुंगाटी वय 49 वर्षे, रा. मिरगुळवंचा, तह. भामरागड, जि. गडचिरोली असे असून, तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे तसेच दिनांक 19/12/2023 रोजी रात्रीचे 22:00 वा. चे सुमारास हिद्दुर गावामध्ये असलेल्या गोटुलजवळ लावण्यात आलेल्या 03 टॅक्टर व 1 जेसीबी जाळपोळ करुन तेथील मजुरांना मारहाण व दमदाटी करण्याच्या अनुषंगाने पोस्टे भामरागड येथे दाखल अप. क्र. 93/2023 कलम 435,427,323,143,147,148,149,120 (ब) भादवि, सह कलम 5,28 भाहका, सह कलम 13,16,18,20,23 युएपीए ॲक्ट मध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरव्यानिशी निष्पन्न झाल्याने त्यास काल दिनांक 21/03/2024 रोजी सदर गुन्ह्रात अटक करण्यात आली.Gadchiroli police तसेच सन 2016 मध्ये एका पोलीस अंमलदाराचे अपहरण करुन खुन केल्याच्या अनुषंगाने पोस्टे भामरागड येथे दाखल अप क्र. 06/2016 कलम 302,364,353,143,147,148,149 120 (ब) भादवि, सह कलम 3,25 भाहका, सह कलम 135 मुपोका मध्ये देखील त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. अधिक तपासात असे दिसून आले की, या आधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता.
अटक जनमिलिशिया आरोपीची माहिती
1) नामे पेका मादी पुंगाटी
कार्यकाळात केलेले गुन्हे
एक जाळपोळ- सन 2023 मध्ये हिद्दुर गावात झालेल्या जाळपोळीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.एक खुन - सन 2016 मध्ये एका पोलीस अंमलदाराचे अपहरण करुन त्याचा खुन करण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.शासनाने जाहिर केलेले बक्षीस.महाराष्ट्र शासनाने पेका मादी पुंगाटी याच्या अटकेवर 1.5 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 74 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा.,मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा.,मा अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. एम. रमेश सा. यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री.अमर मोहिते यांच्या नेतृत्वात पार पडली.Gadchiroli police तसेच मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.