गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात १० उमेदवार रिंगणात.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात १० उमेदवार रिंगणात.!

दि. 30 मार्च 2024 
Vidarbha News India 
गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात १० उमेदवार रिंगणात.!
- दोन उमेदवारांनी घेतली माघार.!
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 12- गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिम दिवशी मिलींद नरोटे व हरिदास बारेकर या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे लोकसभा मतदारसंघाकरिता आता दहा उमेदवारांमध्ये निवडणूकीची लढत होणार आहे. दरम्यान सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप देखील आज करण्यात आले आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी माहिती दिली. 
🔷 हे उमेदवार आहेत रिंगणात :
नामनिर्देश अर्ज मागे घेतल्यानंतर आता 12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव, पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे आहे.  
राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार : अशोक महादेवराव नेते, भारतीय जनता पार्टी (कमळ), डॉ. नामदेव दसाराम किरसान, इंडियन नॅशनल काँग्रेस (हात), योगेश नामदेवराव गोन्नाडे, बहुजन समाज पार्टी (हत्ती).
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार : धीरज पुरूषोत्तम शेडमागे, जनसेवा गोंडवाना पार्टी (करवत), बारीकराव धर्माजी मडावी, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी (शिट्टी), सुहास उमेश कुमरे,भीमसेना (ऑटोरिक्षा), हितेश पांडूरंग मडावी, वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर).
इतर उमेदवार : करण सुरेश सयाम, अपक्ष (ऊस शेतकरी), विलास शामराव कोडापे, अपक्ष(दूरदर्शन),  विनोद गुरुदास मडावी, अपक्ष ( अंगठी)

Share News

copylock

Post Top Ad

-->