दि. 15 मार्च 2024
Vidarbha News India
भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडी मारणार बाजी.! सर्व्हेची आकडेवारी आली समोर..
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी/ नागपूर : लोकसभा निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहे. सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागले असून, प्रचाराचा धुराळा उडाला आहे. आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगत असताना प्रत्येक पक्षाकडून मतदारसंघात विजयाचा दावा केला जात आहे.
मात्र जनेतेच्या मनात नेमकं काय आहे? महाराष्ट्रातील जनतेचा कौल या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाच्या बाजूनं असेल याबाबत नेटवर्क 18 ने सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रातील विभागानुसार कुणाला किती जागा मिळणार यांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मोठी फूट पडली आहे, त्यामुळे यावेळची निवडणुकीत चूरस निर्माण होण्याचा अंदाज आहे. राज्यात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. मेगापोलमधील सर्व्हेनुसार, महाराष्ट्रामध्ये एनडीए आघाडीला 41 जागाा मिळणार असा अंदाज आहे. तर इंडिया आघाडी अर्थात ठाकरे गट आणि पवार गटासह काँग्रेसला 7 जागा मिळण्याची शक्यता आहे.
विदर्भात महायुतीला किती जागा?
विदर्भाबाबत बोलायचे झाल्यास विदर्भ सुरुवातीपासूनच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. भाजपकडून नुकतीच महाराष्ट्रातील लोकसभेच्या वीस उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये विदर्भातील चार जागांचा समावेश आहे. नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपचे उमेदवार आहेत. चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, अकोल्यातून अनूप धोत्रे तर वर्ध्यातून रामदास तडस यांच्या नावाचा या यादीमध्ये समावेश आहे. विदर्भात एकूण दहा जागा आहेत, सर्व्हेनुसार त्यापैकी नऊ जागांवर एनडीए आघाडीचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात केवळ एकच जागा ही महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे.