दि. 08 मार्च 2024
महादेवा माझ्या जनतेला सुखाने समृद्ध कर; आ. डॉ. देवराव होळी यांचे मार्कंडेश्वराला साकडे.!
- आमदार खासदार यांच्या उपस्थितीत मार्कंडेश्वराची महापूजा संपन्न.!
- आमदार डॉ. देवराव होळी यांनी सपत्नीक केले मार्कंडेश्वराचे पूजन.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : महाशिवरात्रीनिमित्त मार्कंडा देवस्थान येथे आमदार डॉ. देवराव होळी, खासदार अशोक नेते यांच्या उपस्थितीमध्ये पहाटे महापूजा संपन्न झाली. यावेळी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मार्कंडेश्वराकडे जनतेच्या कल्याणाची कामना करीत जनेतला सुखाने समृद्ध कर असे साकडे घातले.
महाशिवरात्रीच्या पर्वाच्या सर्व जनतेला आमदार देवराव होळी यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या महापूजेच्या प्रसंगी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या सौभाग्यवती सौ बिणाराणी होळी उपस्थित होत्या.