दि. 11 मार्च 2024
Vidarbha News India
उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर, यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात.!
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी/ नागपूर : दि.११ मार्च २०२४ रोजी पासुन उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर यांच्या कार्यालयासमोर महेश देशमुख औषधी निर्माण अधिकारी,वर्ग-३ यांना दोनपेक्षा जास्त अपत्य असल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावे यासाठी आठ महिन्यांपूर्वी तक्रार करून सुद्धा मा.उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी हेतुपुरस्सर विलंब व टाळाटाळ करत असल्यामुळे त्यांना निलंबित करून त्यांची उचलबांगडी करण्यात यावी.
यासाठी सुरज हजारे, श्रीकृष्णा वाघाडे, वामन राऊत हे बेमुदत ठिय्या आंदोलनास बसले आहेत.