विजेच्या प्रश्नावर खासदार अशोक नेते यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

विजेच्या प्रश्नावर खासदार अशोक नेते यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा.!

दि. 02 मार्च 2024
Vidarbha News India 
विजेच्या प्रश्नावर खासदार अशोक नेते यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा.!
- उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची घेतली भेट.!
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली/देसाईगंज : शेतातील उन्हाळी पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला दिवसा १२ तास वीज पुरवठा देण्याच्या मागणीसाठी दि.२६ फेब्रुवारी २०२४ पासून देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी एसडीओ कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यांची खा.अशोक नेते यांनी  उपोषण मंडपात भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मोबाईलवर संपर्क करून शेतकऱ्यांची व्यथा त्यांना सांगितली. काही तांत्रिक कारणामुळे १२ तासांचा वीज पुरवठा देण्यास महावितरण कंपनीला अडचणी येत आहेत. मात्र यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा बरेच दिवस देसाईगंज तालुक्यातील कृषी पंपांना ८ तासांचा वीज पुरवठा केला जात होता. पण ना.देवेंद्र फडणवीस यांनी या भागातील जंगली प्राण्यांची समस्या लक्षात घेऊन रात्री ऐवजी दिवसा १२ तास वीज पुरवठा देण्याची सूचना वीज कंपनीला केली होती. त्यानंतर काही दिवस १२ तास वीज मिळालीसुद्धा. पण अलिकडे वीज पुरवठा पुन्हा १२ वरून ८ तास करणे सुरू झाले.
कृषीपंपांना दिवसा अपुरा वीज पुरवठा होत असल्याने शेतातील पिकांना पाणी पुरवठा करताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. राज्यभरात वाढलेली विजेची मागणी आणि इतर काही तांत्रिक कारणामुळे सध्या दिवसा १२ तास वीज पुरवठा देण्यास  महावितरण कंपनीने असमर्थता दर्शवली असली तरी यावर लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन ना.देवेंद्र फडणवीस यांनी खा.नेते यांच्याशी मोबाईलवर बोलतांना दिले.
यावेळी लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलालभाई कुकरेजा,सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, तालुकाध्यक्ष सुनिल पारधी, वसंता दोनाडकर,प्रमोद झिलपे,श्याम मस्के, गोपाल उईके,मोहन गायकवाड,रमेश अधिकारी, दुशंत वाटगुरे,राम मेश्राम, विलास बन्सोड, मेश्राम सर तसेच मोठया संख्येने शेतकरी नागरिक बंधू उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Ad

-->