दि. 10 मार्च 2024
Vidarbha News India
Gadchiroli : गोवंश तस्करी करणारे 5 ट्रक जप्त.!
Cattle smuggling :
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : कोरची तालूक्यातून तेलंगानाकडे गोवंशाची तस्करी करणारे 5 ट्रक येथील उपविभागीय पोलिस अधिकार्यांच्या पथकाने जप्त केले. या ट्रकमधून 143 नग गोवंश ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान तस्कर घटनास्थळावरुन पसार होण्यात यशस्वी झाले.
कुरखेडा-कोरची मार्गावर अवैधपणे गौवंशाची तस्करी करण्यात येत असल्याच्या माहीतीवरून बूधवारच्या रात्री गोठणगाव नाक्यावर पोलिसांनी सापळा रचला होता. मात्र तस्करांना याची पूर्वीच कूणकूण लागल्याने ते आड मार्गाने तेलंगानाकडे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करीत मोठ्या शिताफीने त्यांना अटकाव केला. यावेळी तस्करांनी सर्व ट्रकचे वायर तोडत ट्रक तिथेच ठेवत पळ काढला. त्यामुळे घटनास्थळावरून ट्रक पोलिस स्टेशनपर्यंत आणणे अडचणीचे ठरल्याने ट्रकांना ट्रॅक्टरने ओढत आणून कुरखेडा पोलिस स्टेशन येथे जमा करण्यात आले.
ट्रकमध्ये अमानुषपणे सर्व जनावरांचे पाय बांधत त्यांना एकावर एक ठेवण्यात आले होते. त्यामुळे 143 पैकी 4 जनावरे दगावली होती. तर मोठ्या संख्येत जनावरे मरनासन्न अवस्थेत होती. लगेच जनावरांना गौशाळेत पाठविण्याचे ठरवून पवनी येथील गौशाळा व्यवस्थापकांशी संपर्क करण्यात आला व त्यांचाच वाहनाने जिवंत असलेली सर्व जनावरे पाठविण्यात आली. सदर गौशाळेत पोहचेपर्यंत सुद्धा अनेक जनावरे दगावल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांनी दिली.
याप्रकरणी अज्ञात गौ तस्करांविरोधात कुरखेडा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात एकूण 5 ट्रकासह 57 लाख 39 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींचा शोध सूरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती भोसले यांनी दिली आहे.