भाजपा बुथ प्रमुख व वॉरियर्सनी कामाला लागावे; - खासदार अशोक नेते - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

भाजपा बुथ प्रमुख व वॉरियर्सनी कामाला लागावे; - खासदार अशोक नेते

दि. 2 एप्रिल 2024

Vidarbha News India 
भाजपा बुथ प्रमुख व वॉरियर्सनी कामाला लागावे; - खासदार अशोक नेते 
Ashoka Nete 

विदर्भ न्यूज इंडिया 

गडचिरोली : दहा वर्षाच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने अनेक योजना राबवित देशाचा सर्व क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केला. गरीब कल्याण योजना, महिला सशक्तिकरण, देशाअंतर्गत आंतरराष्ट्रीय, देशपातळीवर सुद्धा देशाचे नाव उंचावले आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवायचे असेल तर मलाही विजयी करत अब कि बार चारसौ पार यासाठी बुथ प्रमुख, वॉरियर्स यांनी विजय आपलाच आहे असा संकल्प करून कामाला लागावे, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले.

महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वाखाली दिभना येथे भाजपा बुथ प्रमुख व वॉरियर्स पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, डॉ. नितीन कोडवते, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, भाजपाचे जेष्ठ नेते गजानन येनगंदलवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, तालुकाध्यक्ष विलास पा.भांडेकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास देशमुखे, महामंत्री बंडू झाडे, देवानंद चलाख, महिला मोर्चाच्या अध्यक्ष अर्चना बोरकुटे, शहर महामंत्री अर्चना चन्नावार, जेष्ठ नेते बालाजी पा. जेंगठे, टिकाराम गावतुरे, विनोद चूनारकर, विलास जेंगठे, खुशाल चुधरी, राजू मुरतेली, दुधराम गेडाम, रमेश नैताम आदी उपस्थित होते.



Share News

copylock

Post Top Ad

-->