पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ध्येय गरिबांच्या हिताचे; - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ध्येय गरिबांच्या हिताचे; - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दि. 12 एप्रिल 2024

Vidarbha News India 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ध्येय गरिबांच्या हिताचे; -  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

PM MODI loksabha 

विदर्भ न्यूज इंडिया 

गडचिरोली/आलापल्ली : नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी अशोक नेते यांना विजयी करायचे आहे. गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात मोदी सरकारने देशातील प्रत्येक समाज घटकाचा विकास करण्याचा प्रयत्न केला.

25 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या बाहेर काढण्याचे काम केले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार हे सामान्य व गरिबांचे असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गडचिरोली-चिमूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ क्रीडा संकुल आलापल्ली येथे 11 एप्रिल रोजी भव्य प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री अंब्रीशराव आत्राम, कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम, उमेदवार अशोक नेते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, रवी ओल्लालवार, प्रकाश गेडाम, संतोष मद्दिवार, भाग्यश्री आत्राम यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, विदर्भाचा विकास करणारा समृद्धी आज महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात विकास होत आहे.

PM MODI loksabha तो समृद्धी महामार्ग आता गडचिरोलीपर्यंत करण्याच्या निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे मुंबई ते गडचिरोली हे अंतर आठ ते नऊ तासात पूर्ण करता येईल. गडचिरोलीमध्ये केवळ मागील एका वर्षात मोदींच्या नेतृत्वात 28 हजार घर आपण बांधले, 72 हजार लोकांना शौचालय दिले, 2 लाख लोकांना पिण्याच्या पाण्याच्या नळ मोदीजींच्या योजनेतून गडचिरोलीमध्ये पोहोचविला आहे. दीड लाख शेतकर्‍यांना 6 हजार आणि आपले महाराष्ट्र शासन 6000 अशा प्रकारे 12000 रुपये किसान सन्मान निधीमध्ये दिले. 4 लाख लोकांना आयुष्यमान भारत सरकार योजना, 5 लाख लोकांना आधार कार्ड दिला. अशा विविध योजना, विकासकामे केले आहेत. आता गडचिरोली जिल्ह्याला सुगीचे दिवस आले असून आता परिवर्तन दिसू लागले आहे. पुढच्या पाच वर्षांमध्ये खुप मोठा बदल झालेला दिसेल. त्यामुळे येत्या 19 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीत विकासपुरुष अशोक नेते यांना निवडून दिल्लीला पाठवावा लागेल, असेही ते म्हणाले. यावेळी आहेर विधानसभेतील जवळपास 300 गावातील एकूण दहा हजार नागरिक उपस्थित होते.

नरेंद्र मोदी हे सामान्य माणूस नसून एक शक्ती आहे

PM MODI loksabha नरेंद्र मोदींनी मागील दहा वर्षात जे कार्य केले ते कार्याचा संपूर्ण जगात एक ठसा उमटलेला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदीचे नाव भारतातच नव्हे तर विश्‍वास झाले आहे. आज जगात कुठलाही निर्णय घेताना भारताच्या पंतप्रधानांना विचारल्या जातो. नरेंद्र मोदी असेल तर आपला देश सुरक्षित राहू शकतो. आज आतंकवाद संपुष्टात आला आहे. आज कुठलाही देश भारताकडे वाईट नजरेने पाहू शकत नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी हे सामान्य माणूस नसूल एक शक्ती असल्याचे अंब्रीशराव म्हणाले.

Share News

copylock

Post Top Ad

-->