1 जून पासून चालू होणार RTO आरटीओ चे नवे नियम.! बघा.. - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

1 जून पासून चालू होणार RTO आरटीओ चे नवे नियम.! बघा..

दि. 21.05.2024

Vidarbha News India 

1 जून पासून चालू होणार RTO आरटीओ चे नवे नियम.! बघा..  

विदर्भ न्यूज इंडिया 

New RTO Rules 2024 ( Marathi News ) : देशात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहनधारकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आरटीओने आता नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. दंडांच्या रक्कमेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागू शकते.

१ जूनपासून नवीन वाहतूक नियम लागू होत आहेत.

तुम्हाला जर दंडापासून किंवा कारवाईपासून वाचायचे असेल तर नव्या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे.

 सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) १ जून २०२४ पासून नवीन वाहन नियम जारी करणार आहे. नवीन नियमांनुसार, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना वेगात गाडी चालवणाऱ्यांना २५,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

वेगाने गाडी चालवली तर १००० ते २००० रुपये दंड भरावा लागणार आहे.
अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवले तर २५,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.
जर एखाद्याने परवान्याशिवाय वाहन चालवले तर ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे.

हेल्मेट न घातल्यास १०० रुपये दंड भरावा लागेल आणि सीट बेल्ट न लावल्यास १०० रुपये दंड भरावा लागेल. जर तुम्ही १८ वर्षांपेक्षा कमी वयातच वाहन चालवले तर तुमचा परवाना रद्द होईल आणि तुम्हाला २५ वर्षांपर्यंत नवीन परवाना मिळणार नाही.

ड्रायव्हिंग लायसन्स काढणे झाले सोपे

नव्या नियमानुसार आता ड्रायव्हिंग लायसन्स काढणे सोपे झाले आहे.आता आरटीमध्ये आपल्याला चाचणी द्यावी लागणार नाही. सरकारने या प्रक्रियेला सोपे बनवले आहे. आता १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसेन्स टेस्टसाठी आणखी एक पर्याय असणार आहे. १ जूनपासून तुम्ही सरकारद्वारे मान्यताप्राप्त विशेष संस्थेतही ड्रायव्हिंग टेस्ट देऊ शकता. जर तुम्ही लायसेन्स काढणार असालतर हा पर्याय घेऊ शकता. यामुळे आता लायसेन्स काढणे सोपे झाले आहे.

१६ व्या वर्षीही मिळणार लायसेन्स

जर एखाद्या व्यक्तीचे वय १८ वर्षे पूर्ण झाले असेल तर त्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकते. पण ५० सीसी क्षमतेच्या मोटारसायकलचा परवाना वयाच्या १६ व्या वर्षीही मिळू शकतो. मात्र, हा परवाना १८ वर्षे झाल्यानंतर अपडेट करावा लागेल.

ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता प्राप्त झाल्यापासून २० वर्षे आहे. तुमचे लायसन्स १० वर्षांनी अपडेट करावे लागेल आणि नंतर ४० वयानंतर ५ वर्षांनी अपडेट करावे लागले.

तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता संपल्यावर त्याच दिवशी त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या स्थानिक आरटीओ मध्ये जावे लागेल.


Share News

copylock

Post Top Ad

-->