दि. 31.05.2024
गडचिरोली : पळवुन नेलेल्या अल्पवयीन मुलीचा व आरोपीचा पोलीसांनी लावला शोध.!
- धानोरा पोलीसांनी अवघ्या 24 तासाच्या आत लावला शोध.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, दि. 27 मे 2024 रोजी पोस्टे धानोरा येथील एका अल्पवयीन मुलीला अनोळखी इसमाने फुस लावुन पळवुन नेल्याची घटना घडली होती. सदर घटने बाबत अल्पवयीन मुलीच्या आईने दि. 28/05/2024 रोजी पोस्टे धानोरा येथे तक्रार दिली असता, पोस्टे धानोरा येथे त्वरीत गुन्हा नोंद करुन सदर गुन्हा मपोउपनि स्वरुपा नाईकवाडे यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यानंतर तपासी अधिकारी यांनी अल्पवयीन मुलीचा शोध घेणे सुरु केले. शोध घेत असतांना मुलीच्या आई-वडीलांकडे विचारपुस केले असता तपासा दरम्यान मिळालेल्या एका संशयीत ईसमाच्या मोबाईल क्रमांकांचे क्क़्ङ व च्क़्ङ ची माहिती काढुन तांत्रिक बाबींच्या आधारे संशयीत ईसमाच्या मोबाईलच्या शेवटच्या लोकेशन नुसार आरोपी हा नागपुरवरुन छत्तीसगढ एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करीत असल्याचे दिसुन आले. तसेच सदरची रेल्वे ही नागपुर वरुन मेरठ (उत्तर प्रदेश) येथे जात असल्याची माहिती मिळाली त्यामुळे त्या आरोपी सोबत अप्रहत मुलगी असावी व तो तिला मेरठ येथे घेवुन जात असल्याचा संशय आल्याने तपासी अधिकारी यांनी तात्काळ सदरची माहिती वरिष्ठ अधिकायांना दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दि. 28/05/2024 चे मध्यरात्री मपोउपनि स्वरुपा नाईकवाडे व पोअं/446 चव्हाण हे शासकिय वाहनाने मेरठ करीता रवाना झाले. एकुण 1400 कि.मी. अंतर प्रवास करुन मेरठ येथे पोहचल्यानंतर सायबर पोस्टे गडचिरोली यांच्या मदतीने आरोपीला व अप्रहत मुलीला मेरठ (उ.प्र.) येथील रेल्वे स्थानकावरुन ताब्यात घेऊन पोस्टे धानोरा येथे आणण्यात आले. अधिक चौकशीअंती सदर गुन्हयामधील आरोपी नामे अनुज पाल, वय 37 वर्षे, रा. मेरठ (उ.प्र.) याचे विरुध्द पोस्टे धानोरा येथे कलम 376(2)(त्र्), 376(3) भा.द.वी. सहकलम 4 व 6 पोक्सो अधिनियम 2012 कलमवाढ करुन तात्काळ अटक करण्यात आली आहे. त्यानंतर अल्पवयीन मुलीला तिच्या आई-वडीलांच्या स्वाधीन करण्यात आलेे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, व उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा, सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पोस्टे धानोरा, स्वप्नील धुळे यांचे नेतृत्वात मपोउपनि. स्वरुपा नाईकवाडे गुन्हयाचा पुढिल तपास करीत आहेत. यावेळी संपूर्ण जिल्हयातील नागरिकांनी अशा प्रकारच्या घटनाबद्दल सावध राहुन जर कोणी असे करीत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ त्यांची माहिती पोलीस विभागाला देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी केले आहे.