माजी खासदार अशोक नेते यांचा वाढदिवस विविध सेवाभावी उपक्रमांनी साजरा.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

माजी खासदार अशोक नेते यांचा वाढदिवस विविध सेवाभावी उपक्रमांनी साजरा.!

दि. 1 जुलै 2024 
Vidarbha News India 
माजी खासदार अशोक नेते यांचा वाढदिवस विविध सेवाभावी उपक्रमांनी साजरा.!
मायेच्या उबेने गहिवरले आश्रमातील वृद्ध.!
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोक नेते यांचा वाढदिवस आज विविध सेवाभावी उपक्रमांनी साजरा झाला. दिवसभर चाललेल्या भरगच्च कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक भावस्पर्शी कार्यक्रम गडचिरोलीतील मातोश्री वृद्धाश्रमात झाला. आपल्या सख्ख्या नातेवाईक आणि कुटुंबियांकडून दुर्लक्षित झालेल्या वृद्धांची अशोक नेते यांनी आस्थेने विचारपूस करून त्यांना कोणत्याही अडचणीसाठी काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे, असा धीर देत ब्लॅकेटचे वाटप केले. या मायेच्या उबेने ते वृद्ध गहिवरून गेले.

सर्वप्रथम सेमाना देवस्थानात दर्शन घेऊन पुजापाठ आणि वृक्षारोपण करण्यात आले. यादरम्यान गडचिरोली शहरातील सेमाना रोड, गोकुलनगर येथील कैकाडी समाज मोहल्ला येथे महाप्रसादाचे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नेते यांनी येथील नाल्या, रस्ते, पिण्याचे पाणी आणि इतर समस्या जाणून घेऊन त्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. मातोश्री वृद्धाश्रमात वृक्षारोपण करत वृद्धांना ब्लँकेटचे वाटप तसेच फळांचे वाटप करण्यात आले. आपल्यासोबत येऊन अशोक नेते यांनी आपला वाढदिवस साजरा केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. महिला व बाल रुग्णालय येथे माणुसकीचा घास म्हणून अन्नदान करण्यात आले. याशिवाय चामोर्शी आणि धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयातही रुग्णांना सकस फळांचे वाटप करण्यात आले.

'एक पेड़ माँ के नाम' या उपक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार नेते यांनी आपल्या वाढदिवसाला वृक्षारोपण करण्यास प्राधान्य दिले. निवासस्थानामागील खुल्या जागेतील कॅम्प एरियापासून सेमाना मंदिर, वृद्धाश्रम अशा बहुतांश ठिकाणी माजी खा.अशोक नेते यांनी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरणाला पोषण वातावरण बनविण्यासाठी आपला वाटा उचलला.

यावेळी प्रामुख्याने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री सौ. योगिता पिपरे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश  भूरसे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी,
महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे, डॉ.नितीन कोडवते, डॉ. चंदाताताई कोडवते, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, जिल्हा सचिव मिना कोडाप, भाजपा जेष्ठ नेते सुधाकरराव येंगदलवार, भाजपा गडचिरोली तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, तालुका महामंत्री बंडू झाडे, कामगार मोर्चा प्रदेश सदस्य गोवर्धन चव्हाण, शिवसेना जिल्हा प्रमुख सौ.निताताई वङ्डेटीवार, भाजपाचे नेते अविनाश विश्रोजवार, श्याम वाढई, संजय बारापात्रे, गणेश तिवाडे, पल्लवी बारापात्रे, सिमा कन्नमवार, श्रीदेवी वरंघटे, रमेश नैताम, राकेश राचमलवार, तसेच मोठया संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवार उपस्थित होते.
----------------------------------------
चामोर्शी येथे ग्रामीण रुग्णालय येथे फळे वाटप व वृक्षारोपण..
----------------------------------------
माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनू. जनजाती मोर्चाचे अशोक नेते यांच्या वाढदिवसा निमित्त चामोर्शी ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप व वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न...

यावेळी प्रामुख्याने किसान मोर्चा चे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा नेते रमेश बारसागडे, तालुकाध्यक्ष आनंद  भांडेकर, डॉकटर किलनाके, भास्कर बुरे ओबीसी जिल्हा महामंत्री, संजय खेडेकर तालुका महामंत्री, विनोद गौरकर तालुका महामंत्री, रेवणाथ कुसराम आदिवासी आघाडी जिल्हा महामंत्री, शेषराव कोहळे किसान मोर्चा जिल्हा महामंत्री, माणिक कोहळे शहर महामंत्री, मनमोहन बंडावार, निरज रामानुमवार शहर महामंत्री, नरेश अल्सावार शहर महामंत्री, तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------------------
धानोरा येथे ग्रामीण रुग्णालय येथे फळे वाटप कार्यक्रम संपन्न
----------------------------------------
मा.खा.तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनू. जनजाती मोर्चाचे अशोक नेते यांच्या वाढदिवसा निमित्त तालुका धानोरा ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप कार्यक्रम संपन्न...

यावेळी प्रामुख्याने तालुकाध्यक्षा लताताई पुंनघाटे, शहराध्यक्ष सारंग साळवे,ता. महामंत्री विजय कुमरे, तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Ad

-->