अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना त्वरित मंत्रिमंडळातून बरखास्त करा - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना त्वरित मंत्रिमंडळातून बरखास्त करा




 अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना त्वरित मंत्रिमंडळातून बरखास्त करा

भारतीय जनता युवा मोर्चाचे चामोर्शी येथे निदर्शने

Vidarbha News Gadchiroli:-

 मागील काही दिवसापासून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे उठ सूट पत्रकार परिषदा घेऊन विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर खोटे नाटे आरोप करत आहेत व त्यांच्या मानसिकतेमध्ये काही फरक असल्याचा जाणवते व काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड मधील संबंध पुढे आणले व पुराव्या सोबत त्यांनी या गोष्टीवर शिक्का मोर्तब केला आहे व नवाब मलिक यांनी 2005 साली सरदार वली खान व  सलीम पटेल ज्यांचे टायगर मेमन सोबत संबंध होते त्यांच्याकडून जमिनीचा व्यवहार केला व देश द्रोह केला.

त्यामुळे या विषयाचं गंभीरता घेवुन योग्य ते कार्यवाही करून लवकरात लवकर नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात यावा या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा गडचिरोली तालुका चामोर्शीच्या वतिने गडचिरोली विधानसभेचे  आमदार देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थिती निदर्शने देवुन तहसिलदार मार्फतीने मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.  या आंदोलनात भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सदस्य स्वप्निल वरघंटे , भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख,  प्रतिक राठी ,साईनाथ बुंराडे ,सुरेश शहा ,रामचंद्र वरवाडे ,लोमेश सातपुते, उमेश पिडाले ,विलास चरडुके, शेषराव कोहळे, व भारतीय जनता युवा मोर्चा  पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Ad

-->