केंद्राचे तीन कृषी कायदे अखेर रद्द.. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली मोठी घोषणा…
दिल्ली : संपूर्ण देशात शेतकऱ्यांना नको असलेले केंद्राचे तीन कृषी कायदे अखेर केंद्र शासनाने रद्द केल्याची मोठी घोषणा.. खुद्द देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधन करताना केली आहे. देशात विविध भागांमध्ये केंद्राच्या तीन कृषी कायद्यांन्वये विषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता, यासाठी ठीकठीकांनी आंदोलने सुद्धा करण्यात आली होती. पंजाब दिल्ली आणि उत्तर प्रदेश या भागांमध्ये सदर आंदोलनाची धग जास्त होती. पोट निवडणुकीत झालेली हार, येणाऱ्या निवडणुका आणि शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता प्रधानमंत्री मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द केल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
आज गुरुनानक जयंतीच्या मुहूर्तावर आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक असलेली समिती गठीत करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले तसेच विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे असलेलं आंदोलन विशेषता पंजाब मधील शेतकऱ्यांचे आंदोलन शेतकऱ्यांनी मागे घेऊन कामाला लागावे असेही आवाहन या वेळी प्रधानमंत्री मोदी यांनी शेतकऱ्यांना केली.
