गडचिरोली जिल्ह्यातील १७२ ग्रामपंचायतिमधील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोली जिल्ह्यातील १७२ ग्रामपंचायतिमधील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

 


गडचिरोली जिल्ह्यातील १७२ ग्रामपंचायतिमधील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर...

Vidarbha News India

Gadchiroli:-

राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र, मुंबई यांचे आदेशान्वये दिनांक १७ नोव्हेंबर २०२१ अन्वये निधन राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त  झालेल्या १७२ ग्रामपंचायतीमधील ३५१ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारीक पध्दतीने निवडणूक कार्यक्रम गडचिरोली जिल्हयात राबविण्यात येणार आहे.

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रसिध्द केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसुचनेमध्ये सुधारणा करण्याचा दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ हा आहे.  .

तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ व  नामनिर्देशन मागविण्याचा आणि सादर करण्याचा दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ च्या सकाळी ११ वाजतापासून ते दुपारी ३ वा.पर्यंत आहे.  नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक ७ डिसेंबर २०२१ ला सकाळी ११ वाजतापासून छाननी संपेपर्यत असणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक ९ डिसेंबर २०२१ ला  दुपारी ३ वाजतापर्यँत आहे. 

निवडणूक चिन्ह नेमुन देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक ९ डिसेंबर २०२१ ला  दुपारी ३ वाजतानंतर आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक २१ डिसेंबर २०२१ ला गडचिरोली जिल्ह्यासाठी सकाळी ७.३० वा. पासून ते दुपारी ३ वा. पर्यत आहे. 

तर मतमोजणी दिनांक २२ डिसेंबर २०२१ होणार आहे.  असे निवडणुकीचे टप्पे असून या होणाऱ्या निवडणूकीत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून निवडणुक प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->