९ नगरपंचायतीसाठी २१ डिसेंबरला मतदान, २२ ला मतमोजणी - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

९ नगरपंचायतीसाठी २१ डिसेंबरला मतदान, २२ ला मतमोजणी

 


मुदत संपून एका वर्षाच्या कालावधीनंतर जिल्ह्यातील ९ नगर पंचायतीचे निवडणूक कार्यक्रम जाहीर 

९ नगरपंचायतीसाठी २१ डिसेंबरला मतदान, २२ ला मतमोजणी

Vidarbha News India

Gadchiroli:-

विविध ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; २२ डिसेंबर २०२१ मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली.

   तसेच गडचिरोली जिल्यातील मुलचेरा,एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड.नगपंचायतींचे मुदत मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात संपली होती मात्र कोरोना सदृश्य कारणास्तव जिल्ह्यातील निवडणुका पुढे ढकलण्यात आले होते .

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे मुदत संपून तब्बल एका वर्षाच्या कालावधीनंतर जिल्यातील नगरपंचातींचे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या डिसेम्बर २१ रोजी निवडणूक तर २२ डिसेम्बरला मत मोजणी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नगरपंचायत क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाला आहे .

Share News

copylock

Post Top Ad

-->