Vidarbha News India :-
जिल्ह्यातील आदिवासींच्या समस्यांवर दिल्लीतील राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या संचालकाशी चर्चा
*- अॅड. बोधी रामटेके यांची आयोगाला भेट*
दिनांक: २९ नोव्हेंबर २०२१
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजाला अनेक वर्षांपासून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व इतर अश्या अनेक प्रश्न सामोरे जावे लागत आहे आणि दिवसेंदिवस त्यांच्या समोरील प्रश्न वाढतच चालले आहेत. या सगळ्या प्रश्नांवर काल गडचिरोली जिल्ह्यातील ऍड. बोधी रामटेके यांनी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगात भेट देऊन संचालकांशी सविस्तर चर्चा केली.
पाथ फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या २ वर्षांपासून अदिवासी हक्कांच्या उल्लंघना विरोधात अनेक खटले मानवाधिकार आयोग व इतर आयोगापुढे दाखल करण्यात आले होते. त्यातील काही खटले प्रलंबित आहेत. प्रलंबित असलेले किंवा आदिवासींचे इतर प्रश्न राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे दाखल करण्याचा सल्ला आयोगाचे संचालक डॉ. ललित लट्टा यांनी दिला व त्यावर योग्य तो तोडगा काढण्याचा प्रयन्त करण्यात येईल असे सुद्धा सांगितले.
जिल्ह्यातील अदिवासी समाज आजही दर्जेदार शिक्षण, मुबलक आरोग्य सेवे पासून वंचित आहे, सोबतच अनेक कारणांमुळे त्यांच्या संस्कृतीचे सुद्धा ऱ्हास होत आहे. या सगळ्या समस्यांवर सविस्तर चर्चा झाली असल्याचे ऍड. बोधी रामटेके यांनी सांगितले.
पाथ फाउंडेशनच्या माध्यमातून ऍड. बोधी रामटेके, ऍड. दीपक चटप, ऍड. वैष्णव इंगोले व टीमने हाती घेतलेल्या कामाची प्रशंसा करत, आदिवासी हक्कांवर अजून जोमाने काम करण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहावे अशी भावना संचालकांनी व्यक्त केल्याचे ऍड. रामटेके यांनी सांगितले.
