चामोर्शी येथील नगर पंचायत उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅली व जाहीर सभेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद
- चामोर्शी नगरपंचायत मधील जनतेच्या भविष्यासाठी कमळाला विजयी करा
- शेतकरी, शेतमजूर, कामगार बेरोजगार, सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या या महाविकास आघाडी सरकार ला मतदानाच्या माध्यमातुन धडा शिकवा - चामोर्शीच्या ठेकेदारांना धडा शिकवून भाजपाच्या उमेदवारांना निवडून द्या आमदार डॉ. देवराव होळी यांचे जनतेला आवाहन
नगरपंचायत मधील जनतेच्या भविष्यासाठी नगर पंचायती मध्ये कमळाला मत देवून भाजपाला एकदा संधी द्या असे आवाहन राज्याचे लोकलेखा समितीचे अध्यक्ष, माजी वित्त नियोजन व वनमंत्री ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी चामोर्शी येथील नगर पंचायतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये केले .
यावेळी मंचावर गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रमेश बारसागडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ योगिताताई भांडेकर, तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, जिल्हा सचिव आनंद गण्यारपवार ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री आशिषभाऊ पिपरे यांचेसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
चामोर्शी येथील नगर पंचायत उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला व रॅलीला जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला.
यावेळी बोलतांना सुधीरभाऊ म्हणाले की याआघाडी सरकारला शेतकऱ्यांच्या नुकसानीचे, निराधार गरिबांच्या मदतिचे पैसे देत नाही मात्र दारुवाल्याना, ठेकेदारांना पैसे द्यालया कमी पाडत नाही. हे तिघाडी सरकार जनतेच्या कल्यानासाठी नाहीं तर जनतेच्या विनाशासाठी आलेले आहेत.
या सरकारने केवळ आणी केवळ जनतेची फसवणूक केली आहे त्यामुळे या सरकारला या निवडणुकीत धडा शिकवा व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
चामोर्शीच्या विकासासाठी आणलेला निधी केवळ ठेकेदारांनी आपल्या विकासासाठी वापरला आणि आता तेच ठेकेदार उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करून त्यांना योग्य धडा शिकवावा असे आवाहन यावेळी आमदार महोदयांनी मार्गदर्शन करताना केले.
