राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार विद्यार्थ्यांचें प्रस्ताव तत्काळ पाठवा... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार विद्यार्थ्यांचें प्रस्ताव तत्काळ पाठवा...


Vidarbha News India
Nagpur :-

मागीलवर्षातील  फेब्रुवारी व मार्च 2021 मध्ये दहावी व बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या अनुसूचित जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी   करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयाचे  प्राचार्य व शाळांचे मुख्याध्यापकांनी पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर  या विद्यार्थ्यांची राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी  निवड करुन  प्रस्ताव त्वरित सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून विभागीय बोर्ड, तालुका, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रथम आलेल्या अनुसूचित जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार देण्यात येतो. सदर पुरस्कार मिळण्यासाठी आवश्यक त्या कागद पत्रांसह प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर यांच्याकडे सादर करावे.
अधिक माहितीसाठी  कार्यालय सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन शासकीय आय.टी.आय समोर श्रध्दानंदपेठ, नागपूर येथे संपर्क करावा.

Share News

copylock

Post Top Ad

-->