कोंबडे बाजार वर धाड टाकून पोलिसांची नागरिकांना बेदम मारहाण : पीडित नागरिकांचा आरोप दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

कोंबडे बाजार वर धाड टाकून पोलिसांची नागरिकांना बेदम मारहाण : पीडित नागरिकांचा आरोप दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

Vidarbha News India
Gadchiroli:-
कोंबडे बाजार वर धाड टाकून पोलिसांची नागरिकांना बेदम मारहाण : पीडित नागरिकांचा आरोप दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा 

- पत्रकार परिषदेत पीडित नागरिकांचा आरोप 
- दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा 

आदिवासींच्या परंपरागत मनोरंजनाचा खेळ म्हणून ग्रामीण भागात सुरू असलेल्या पोटेगाव पोलीस मदत केंद्रातील प्रभारी पोलीस अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गव्हाळहेटी येथील कोंबडेबाजारावर हप्ता न दिल्यामुळे १९ डिसेंबर रोजी धाड टाकून बाजारातील नागरिक, भजे विक्रेते, व इतर छोट्या दुकानदारांसह महिलांना अमानुषपणे मारहाण केली. त्यातील अनेकांच्या पाठीवर आणि पोटावर दंड्याने मारहाण केली. एवढेच नव्हे तर कारवाई केल्यापासून सतत ६ दिवस पिडीतांना तक्रार करावयास जाण्यापासून रोखण्यासाठी पोलीसी बळाचा वापर करीत नजरकैदेत ठेवण्यासारखा प्रकार केला.

त्यामुळे पोटेगांव इलाका ग्रामसभांमधील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष व्याप्त असून यापूढे पोलीसांच्या कुठल्याही कार्यक्रमास जायचे नाही अस निर्णय घेतला असल्याचे ग्रामसभांचे नेते, पिडीत नागरिक व लोकप्रतिनिधींनी आज शनिवारी गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यासोबतच अमानूष मारहाणीची व प्रभारी अधिकाऱ्याने मागितलेल्या व दिलेल्या लाचेची तक्रार गडचिरोली पोलीस स्टेशन व जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली असून प्रभारी पोलीस अधिकारी गोडसे, सहकारी उरकूडे यांचेवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी केली आहे.

पोटेगाव इलाका ग्रामसभेचे नेते शिवाजी नरोटे, धानोरा पं.स. च्या सदस्य मालताबाई मडावी, जानकी कुमरे, कांता हलामी, संदीप पोटावी, नरेन्द्र कन्नाके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की प्रभारी अधिकारी गोडसे यांनी कोंबडेबाजारासाठी लेखी परवानगी देता येत नाही. मात्र तोंडी परवानगी देतो त्यासाठी ४० हजार रुपये द्यावे लागतील अशी तोंडी परवानगी घेऊन एक महिण्यापूर्वी कोंबडे बाजार सुरू झाला. दोन तीन बाजारानंतर गोडसे यांना २० हजार रुपये दिले. मात्र त्यांनी उर्वरीत पैशांसाठी तगादा लावत १९ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ३ वाजताच्या दरम्यान गव्हाळहेटी येथील बाजारावर धाड टाकली व बाजारातील नागरिक, छोटे विक्रेते महिलांना अमानूषपणे मारहाण केली, कोंबडेही मारले व त्यातील अंदाजे ६० ते ७० कोंबडे पोलीस मदत केंद्रात घेऊन गेले. मारहाण झालेले पिडीत पोटेगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ गेले असता तेथील डाॅक्टरांवर दबाव टाकून एम.एल.सी झाल्याशिवाय उपचार करायचे नाहीत व उपचार केल्यास मारहाणीचे वर्णन करायचे नाही अशी सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
इलाक्यातील नागरिक पोलीसांच्या कारवाई विरूध्द संतप्त असल्याचे बघून २० डिसेंबरपासून आज २५ डिसेंबर पर्यंत नेते, पिडीतांचे व लोकप्रतिनिधींचे घरी जाऊन दिवसभर त्यांना बाहेर जाण्यापासून प्रतिबंध करण्याचे कारस्थान केले. स्थानिक वाहनधारकांना कुणालाही घेऊन जाण्यास मनाई केली. व पोलीसी खाक्याचा कहर केला. शेवटी पिडीतांनी मिळेल त्या साधनांनी गडचिरोली गाठली व पोटेगावचे प्रभारी पोलीस अधिकारी गोडसे व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात लेखी तक्रार करीत गुनहे दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. सदर अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत इलाक्यातील नागरिक पोलीसांच्या कुठल्याही कार्यक्रमांना जाणार नाहीत व सहकार्य करणार नाहीत अशी भूमिका घेतानाच सोमवारी न्यायालयात धाव घेऊन गुन्हे दाखल करण्यासाठी याचिका दाखल करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदेत कालीदास कडपाती, महारू नरोटे, नामदेव जुमनाके, सुखदेव सुरपम, अभिमन्यू सुरपम, बिका तुलावी, शालीक पोटावी, नागसू मडावी, मारोती गावडे, मोतीराम उसेंडी, संजय पोटावी यांसह पिडीत नागरिक उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Ad

-->