जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील १५६ ग्राम वीज सेवकांना वीज वितरण कंपनीच्या सेवेत कायम करा : आमदार डॉ. देवराव होळी - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील १५६ ग्राम वीज सेवकांना वीज वितरण कंपनीच्या सेवेत कायम करा : आमदार डॉ. देवराव होळी


Vidarbha News India
Gadchiroli:-
जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील १५६ ग्राम वीज सेवकांना वीज वितरण कंपनीच्या सेवेत कायम करा : आमदार डॉ. देवराव होळी.

आदिवासी  विकास मंत्री के सी पाडवी यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे केली मागणी
- सेवेत कायम केल्यास नवीन घरगुती  वीज कनेक्शन, मीटर रिडिंग, ब्रेक डाऊन, थकबाकी वसुली, वीज चोरीला आळा यासारख्या ग्रामीण भागातील विद्युत समस्या मार्गी लागण्यास  होणार मदत
 गडचिरोली सारख्या अतिदुर्गम ,नक्षलग्रस्त, डोंगराळ भागात काम करणाऱ्या १५६ ग्राम विजसेवकांना नियुक्ती देताना ११-११ महिन्यांची मुदतवाढ न देता त्यांना सेवेत नियमित करावे करण्यात यावे अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांची मुंबई येथे भेट  घेऊन  निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नंदूभाऊ नरोटे, मोहनभाऊ पुराम यांचेसह ग्राम वीजसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर नरोटे उपस्थित होते.
गडचिरोली जिल्हयातील पेसा अंतर्गत क्षेत्रात २०१६ ते २०१७ मध्ये १५६ ग्राम विज सेवकांना नियुक्ती करण्यात आलेली होती .तदनंतर सत्र २०१६ , २०१७ , २०१८ , २०१९ , २०२० , २०२१ मध्ये ११-११ महिन्याचे नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत . आजतागायत सदरील १५६ ग्राम विज सेवक गडचिरोली जिल्हयातील अतिदुर्गम डोंगराळ भागातील आय.टी.आय. धारक सुशिक्षित बेरोजगार युवक युवती असून आदिवासी ग्रामीण भागामध्ये प्रामाणिकपणे विज वितरणाचे कार्य करीत आहेत . त्यांच्या कार्याला ६ वर्षे पूर्ण झाले आहेत. मात्र त्यांना नियमित न करता केवळ मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यांना  सेवेत कायम केल्यास नवीन घरगुती  मीटर कनेक्शन, मीटर रिडिंग, ब्रेक डाऊन, थकबाकी वसुली, वीज चोरीला आळा यासारख्या ग्रामीण भागातील विद्युत समस्या मार्गी लागून त्याचा मोठा लाभ वीज वितरण कंपनीला होईल. त्यामुळे सदर बाब व जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता त्यांना ११-११ महिन्यांची मुदतवाढ न देता विज वितरण कंपनीच्या सेवेत कायम करण्यात यावे अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.

Share News

copylock

Post Top Ad

-->