Gadchiroli:-
जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हा अग्रणी बँकेच्या माध्यमातून सर्व प्रमुख बँकांच्या अधिकाऱ्यांशी बैठक
पात्र असणाऱ्या लोकांना बँकेने तातडीने कर्ज उपलब्ध करुन द्यावे
मा.जिल्हाधिकारी यांचे बँकांना निर्देश
दिनांक २९ डिसेंबर २०२१ गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्याची मागास अशी ओळख पुसण्यासाठी जिल्ह्यात उद्योग उभारण्यासाठी बँकांनी उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी विनंती आमदार डॉ देवरावजी होळी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा अग्रणी बँकेच्या माध्यमातून झालेल्या प्रमुख बँकांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.
यावेळी मा.जिल्हाधिकारी संजयकुमारजी मीना, एल. डी. एम. टेंभूर्णेजी यांचेसह प्रमुख बँकांचे अधिकारी प्रामुख्यानं उपस्थित होते.
या प्रसंगी मा. जिल्हाधिकारी यांनी पात्र असणाऱ्या लोकांना बँकांनी कर्ज उपलब्ध करुन द्यावे असे निर्देश बैठकीला उपस्थित असलेल्या बँकेंच्या अधिकाऱ्यांना दिले
गडचिरोली जिल्ह्यात उद्योगाला पूरक वातावरण आहे. परंतु जिल्ह्यातील लोकांची आर्थिक परिस्थिती मजबूत नसल्याने त्यांना व्यवसाय-उद्योग उभारण्यासाठी बँकांवर अवलंबून राहावे लागते. त्यासाठी अनेक व्यवसायी उद्योगी आपल्या व्यवसायाला बँकेकडून कर्ज मिळावे याकरिता अर्ज करतात परंतु बँकेकडून कर्ज उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यात नविन उद्योग सुरू होवू शकले नाहीत. त्यामुळे नविन तसेच इच्छुक उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून दिल्यास जिल्ह्यात उद्योग वाढीला चालना मिळेल. रोजगार उपलब्ध होईल व त्यातुन जिल्हयाच्या विकासाला गती मिळेल . त्यामुळे मागास अशी ओळख पुसण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील नवउद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी बँकांनी कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी विनंती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा अग्रणी बँकेच्या माध्यमातून झालेल्या प्रमुख बँकांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकित केले.