Vidarbha News India:-
VNImedia:-
गडचिरोली पोलीस दलातील 7 अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक जाहीर.
- १ पोलीस अंमलदार यांना मिळाले गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक
पोलीस दलात कार्यरत असतांना नेमणुकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रजासत्ताक दिनानिमीत शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी सुध्दा गडचिरोली पोलीस दलातील ०७ अधि./ अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व ०१ पोलीस अंमलदार यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. निश्चितच गडचिरोली पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद कामगिरी आहे.
राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पोउपनि भरत चिंतामण नागरे, सहा.
फौ/२१९१ गोपाल मनिराम उसेंडी, पोहवा / २७२३ निलेश्वर देवाजी पदा, पोहवा / ३१०८ संतोष विजय पोटावी, नापोशि/२७४४ दिवाकर केसरी नरोटे, नापोशि/३००६ महेंद्र गणू कुलेटी, पोशि/ ५३९५ संजय गणपती बाकमवार तसेच सहा.फौ./१२१२ बस्तर लक्ष्मण मडावी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहेत.
राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्राप्त सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी असतांना उल्लेखनिय व वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. या कामगिरीची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक बहाल करण्यात आलेले आहे. सदर पोलीस अधिकारी व अंमलदारांनी उल्लेखनिय व वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने त्यांचे पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले असून त्यांच्या पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.