Vidarbha News India:-
VNImedia:-
जिल्हा परिषद गडचिरोली येथे राष्ट्रीय मतदान दिन साजरा
जिल्हा परिषद गडचिरोली येथे आज २५ जानेवारी २०२२ रोजी राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
संदर्भीय पत्रानुसार १८ वर्ष पूर्ण केलेल्या नवतरुण मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे व त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविणे या मुख्य उद्देशाने लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्याचा " राष्ट्रीय मतदार दिन " कार्यक्रम फरेंन्द्र कुतोरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (सा.प्र.) यांचे अध्यक्षतेखाली तथा आर. आर. चौधरी जिल्हा जल संधारण अधिकारी (ल.पा.) जिल्हा परिषद, गडचिरोली व नरेश एम. कनोजिया कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांचे प्रमुख उपस्थित 'राष्ट्रीय शहीद विर बाबुराव शडमाके सभागृहात' जिल्हा परिषद गडचिरोली येथे आज सकाळी ठिक ११.०० वाजता कार्यक्रम पार पाडला. .
यावेळी कार्यक्रमाला राजेश कंगाले, अमित कवाडघरे, प्रविण कन्नाके, आशिष गामोटकर, रुपेश आत्राम तसेच जिल्हा परिषद, गडचिरोली येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सारंगधर गायकवाड क.सहा. जिल्हा परिषद गडचिरोली यांनी केले.