Vidarbha News India:-
vnimedia:-
नववर्षाच्या शुभपर्वावर आमदार डॉ. देवरावजी होळी भरवणार जनता तक्रार दरबार...
-जनतेच्या तक्रारी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी या तक्रार दरबाराचे आयोजन...
गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी २०२२ या नवीन वर्षाच्या शुभपर्वावर गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी जनता तक्रार दरबार भरविण्याचा संकल्प केलेला आहे. महिन्याच्या प्रत्येक सोमवारला गडचिरोली, १ ला २ रा व तिसरा गुरुवार चामोर्शी तर शेवटचा गुरुवार धानोरा येथे दुपारी १२ ते ३ वाजता जनता तक्रार दरबार भरणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी दिली आहे.
गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम नक्षलग्रस्त आहे. आपल्या समस्या घेवून जिल्ह्यातील दुर्गम भागातून आलेल्या लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
तालुका व जिल्हा केंद्रावर आपल्या कामासाठी त्यांना वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे जनतेच्या लहान-मोठ्या कामासाठी येणार्या अडचणी दूर व्हाव्यात याकरिता आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये जनता तक्रार दरबार भरविण्याचा संकल्प केला आहे. महिन्याच्या प्रत्येक सोमवारला गडचिरोली, १ ला २ रा व तिसरा गुरुवार चामोर्शी तर शेवटचा गुरुवार धानोरा येथे दुपारी १२ ते ३ वाजता होणार या जनता तक्रार दरबाराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी दिली आहे.