गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह सर्व तालुक्यात कोविड मदत कशाची स्थापना. - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह सर्व तालुक्यात कोविड मदत कशाची स्थापना.

Vidarbha News India:-
VNImedia:-

गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह सर्व तालुक्यात कोविड  मदत कशाची स्थापना.

- कोविडबाबत जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी घेतला तालुकास्तरीय आढावा.

गडचिरोली जिल्हयातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या पाहता संपुर्ण जिल्हयात कोविड संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना कार्यान्वीत करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून रूग्ण व त्यांचे नातेवाईक यांना मदतीकरीता व प्रशासनाच्या सनियंत्रणाकरीता प्रत्येक तालुक्यात व संपुर्ण जिल्हयासाठी असे मिळून एकुण 14 विविध कोविड नियंत्रण मदत कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यात रूग्णांसाठी कोविड केअर सेंटर कार्यान्वीत करण्यात येत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी तहसीलदार, गट विकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांचा आढावा घेतला.


यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते.

बारा तालुक्यात बारा ठिकाणी तालुका कोविड नियंत्रण कक्ष, जिल्हयाच्या ठिकाणी जिल्हा कोविड नियंत्रण कक्ष व सामान्य रूग्णालयात मदत केंद्र अशा 14 नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली. 

तालुका स्तरीय नियंत्रण कक्ष व त्यांचे संपर्क क्रमांक
 
अहेरी - 07133-295001
भामरागड - 07138-254028, 9421008827, 9421008807
चामोर्शी - 07135-295240
धानोरा- 8275600746/8275114890
एटापल्ली- 9404933065, 7588442412
कोरची - 8275932599
सिरोंचा - 07131-233129
गडचिरोली- 07132- 233019, 9209155955, 9673198415
आरमोरी - 07137-266508, 9209151047
वडसा- 07137- 272400/9404128880
मुलचेरा - 8275879981, 07135-271033
कुरखेडा - 07139-245199

जिल्हा कोविड नियंत्रण कक्ष
07132-222030/222031/9423911077

मदत केंद्र सामान्य रूग्णालय, गडचिरोली
07132-222340/222191

या संपर्क क्रमाकांवर सकारात्मक रूग्णांचा पाठपुरावा करणे, रूग्णांना गृहविलगीकरणामधील आवश्यक मदत पुरविणे, भरती रूग्णांबाबत नातेवाईकांना माहिती देणे तसेच रूग्णासाठी बेडची उपलब्धता अशा सुविधा तालुका निहाय त्या त्या कोविड नियंत्रण कक्षाद्वारे दिल्या जाणार आहेत. तर जिल्हा कोविड नियंत्रण कक्षामधून नागरिकांना नमुना पॉझिटीव आल्यास कळविणे, तक्रार निवारण, बेडची उपलब्धता तसेच रूग्णांबाबतची माहिती दिली जाणार आहे.
 
तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वीत करण्यात येत आहेत. यामध्ये जिल्हा मुख्यालयी यापुर्वीच सुरू असलेले दोन डिस्ट्रीक्ट कोविड हॉस्पीटल व तालुका निहाय सहा डिस्ट्रीक्ट कोविड केअर हॉस्पीटलची क्षमता वाढविण्यात येत आहे. बाधित रूग्णांना आवश्यक सेवा देण्यासाठी तालुक्यात 13 ठिकाणी कोविड केअर सेंटरची स्थापना पुन्हा करण्यात येत आहे. या कामांच्या तयारीबाबत आज जिल्हाधिकारी यांनी सविस्तर आढावा घेतला.

Share News

copylock

Post Top Ad

-->