Vidarbha News India:-
VNImedia:-
गडचिरोली : नक्षल्यांकडून वाहनाची जाळपोळ
भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्राअंतर्गत इरपणार येथे रस्त्याच्या कामावर असलेल्या वाहनांची नक्षल्यांकडून जाळपोळ केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली असून सदर घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे .
सविस्तर वृत्त असे कि तालुका मुख्यालयापासून १८ किमी अंतरावर असलेल्या इरपणार येथे पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत रस्त्याच्या बांधकाम सुरु होते आज दुपारी २ वाजताच्या सुमारास काही गणवेश धारी नक्षल्यांनी सदर रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ केली असून यात ९ ट्रॅक्टर , २ जेसिबी , १ ग्रेडर चा समावेश असून सुमारे दीड कोटी रुपयांचा वाहनांना नक्षल्यांनी पेटवून दिले आहे यामुळे परिसरातील रस्ता , पुलाच्या बांधकामावर परिणाम होणार आहे तसेच अनेक दिवसांनी नक्षल्यांनी पुन्हा डोके वर काढल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे .