जि. प.उच्च प्रा.शाळा मुरखळा माल येथे क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांची जयंती साजरी... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

जि. प.उच्च प्रा.शाळा मुरखळा माल येथे क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांची जयंती साजरी...

Vidarbha News India:-
Gadchiroli:-
जि.प.उच्च प्राथमिक शाळा मुरखळा माल येथे क्रांतीज्योती साविञीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणुन विवीध उपक्रमासह उत्साहात साजरी करण्यात आली. 
*चामोर्शी :-                                       
जि.प.उच्च प्राथमिक शाळा मुरखळा माल तथा महाराष्टृ अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा चामोर्शी च्या संयुक्त विद्यमाने आज ३ जानेवारी २०२१ रोजी जि.प.उच्च प्राथमिक शाळा मुरखळा(माल) येथे क्रांतीज्योती साविञीबाई फुले जयंती *बालिका दिन* म्हणुन विविध उपक्रमाद्भारे मोठ्या आंनदात व उत्साहात साजरा करण्यात आली .                                      
 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  स्थानी शाळेतील मुख्याध्यापक गणेश बोईनवार,प्रमुख अतिथी शाळा समितीचे उपाध्यक्ष निलकठं सोमनकर,पदवीधर विषय शिक्षक तथा महा.अनिस शाखा चामोर्शी चे अध्यक्ष रघुनाथ भांडेकर,जेष्ठ शिक्षक रमेश गेडाम,सहा.शिक्षक चंद्रकांत वेटे ,जगदिश कळाम , राजकुमार कुळसंगे, अशोक जुवारे, कमलाकर कोंडावार,अंगणवाडी शिक्षिका सुरेखा राऊत,पुष्पा बुरे,कयादुबाई राऊत मदतनिस पुष्पा मोहुर्ले,श्रीमती गेडामताई आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच शाळेतील विद्यार्थी या बालिका दिनाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेतील ब-याच विद्यार्थ्यांनी व शिक्षकवृंदानी बालिका दिनावर आधारीत आपल्या भाषणातुन प्रकाश टाकला.सर्वप्रथम "बालिका दिनानिमीत्त* गावातुन प्रभातफेरी काढण्यात आली.तदनंतर गावातील महिला भगिनींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.  बालिका दिनानिमित्त शाळेत विवीध स्पर्धांचे व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्रामुख्याने याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा,भाषण स्पर्धा,निबंध स्पर्धा,वेशभुषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक जुवारे यांनी केले.संचालन श्री जगदिश कळाम यांनी केले तर आभार चंद्रकांत वेटे यांनी मानले.

Share News

copylock

Post Top Ad

-->