Vidarbha News India:-
Gadchiroli:-
जिल्हा परिषद गडचिरोली येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक 31 डिसेंबर 2021 नुसार निर्देशीत केल्याप्रमाणे आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह जिल्हा परिषद, गडचिरोली येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
श्रीमती हेमलता एच. परसा शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि. प. गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तसेच प्रमुख पाहुणे श्रीमती गायत्री सोनकुसरे सहा. प्रशा. अधिकारी (सा.प्र.) व धनंजय दुम्पट्टीवार सहा. प्रशा. अधिकारी (शि.वि.), नरेश एम. कनोजिया कनि. प्रशा. अधिकारी व रितेश वनमाळी कनि. प्रशा. अधिकारी (सा.प्र.वि.) जि.प. व गडचिरोली यांचे प्रमुख उपस्थित 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह जिल्हा परिषद, गडचिरोली येथे 03 जानेवारी, 2022 ला सकाळी ठिक 11.00 वाजता पार पडला. .
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे गिरीष बुद्धावार, नेताजी पुसाम, पराग कोराम, विशांत कुंभरे, श्री सारंग गायकवाड, अमित कवाडघरे, श्रीमती गिता पदा, श्रीमती नितू नरोटे, श्रीमती कोवे, श्रीमती सारिका मेश्राम, श्रीमती शारदा कोवे, श्रीमती रिना दरडमारे, श्रीमती अश्विनी खेवले, संतोष कस्तुरे, श्रीमती वंदना मडावी, श्रीमती राजुरकर, श्रीमती मंगला फरकाडे, श्रीमती ममता मडावी तसेच सर्व विभागातील अधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन मयुर क्रिष्णापूरकर वरिष्ठ सहाय्यक जिल्हा परिषद गडचिरोली यांनी केले.