Vidarbha News India:-
Gadchiroli:-
देशात शांतता आणि एकोपा जोपासण्यासाठी बुद्धांच्या विचारांची गरज-- महेंद्र ब्राम्हणवाडे
बुद्ध विहार हे फक्त भक्तीचे केंद्र न राहता येथे बुद्धांच्या ज्ञानाचा आणि विचारांचा प्रसार झाला पाहिजे-- रोहिदास राऊत
अमिर्झा येथे मान्यवरांच्या हस्ते बुद्ध विहाराचे अनावरण...
गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा येथे दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी बुद्ध विहारचे अनावर करण्यात आले.
देशात सद्या अराजकता व अशांततेचा वातावरण निर्माण झालेला आहे असे असतांना देशातच नाही तर आज जागतिक शांततेसाठी बुद्धांच्या विचारांची गरज आहे. भारताचे माजी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या कार्यकाळात बुद्धांच्या पंचशील तत्वावर आपली विदेश निती ठरवली होती. बुद्धांचा मार्ग म्हणजे नेहमी शांतता आणि अहिंसेचा मार्ग आहे त्यामुळे वयक्तिक व सार्वजनिक आयुष्यात देखील बुध्द अंगीकारने काळाची गरज आहे. असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले. ते सहउद्घाटक म्हणून बोलत होते.
यावेळी उद्घाटक म्हणून सागर मानकर, अध्यक्ष म्हणून रोहिदास राऊत, सहउद्घाटक म्हणून महाराष्ट्र प्रदेश चे महासचिव तथा माजी आम. डॉ.नामदेवराव उसेंडी, इंजि.रुपेश उंदिरवाडे, मार्गदर्शक म्हणून विजयजी बन्सोड मुख्य अतिथी म्हणून प्रा.राजूकमार शेंडे, काँग्रेस नेते वसंत राऊत, दिवाकर मिसार, ठिवरू मेश्राम सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.बुद्ध विहार हे फक्त भक्तीचे केंद्र न राहता येथे बुद्धांच्या ज्ञानाचा आणि विचारांचा प्रसार झाला पाहिजे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहिदास राऊत यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता बांबोले तर आभार संदीप भैसारे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध बांधव यावेळी उपस्थित होते.