शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत शाळा स्तर मेळाव्याने बोळधा गाव दुमदुमलं....! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत शाळा स्तर मेळाव्याने बोळधा गाव दुमदुमलं....!

Vidarbha News India:-
VNI:-
शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत शाळा स्तर मेळाव्याने बोळधा  गाव दुमदुमलं....!

(गडचिरोली/ देसाईगंज) :-

आज सकाळी 7:30 ते 12ः30 सुमारास या वेळात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोळधा ,केंद्र विसोरा  येथे शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत प्रथम मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.

कार्यक्रमात मुख्य  मार्गदर्शक मा.कुमार आशीर्वाद साहेब. मा.डॉ विनित मत्ते साहेब, तसेच मा.चापले साहेब गटशिक्षणाधिकारी पं.स.देसाईगंज.यांनी सुद्धा  कार्यक्रमात मोलाचं वेळ देऊन मार्गदर्शन केलें.

या मेळाव्याला  आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार मा.कृष्णाजी गजबे ,मा.मोहन पाटील गायकवाड माजी सभापती पं.स.देसाईगंज बोळधा ग्रा.पं.येथील सरपंच मा.भाग्यश्रीताई गायकवाड,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री,पितांबरजी गायकवाड, गावचे उपसरपंच मा.राजु गायकवाड , पोलीस पाटील मा.खुशालजी मस्के, श्री .दिनेशजी साखरे अध्यक्ष तं.मु.स.बोळधा शाळेचे  मुख्याध्यापक श्री.एम.एस.होळी सर, कार्यक्रमाचे संचालन  श्री.मुंजमकार  सर,तर आभार प्रदर्शन श्री.लांजेवार सर यांनी मानले .
शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्यगण ,शाळेतील शिक्षक श्री.परशुरामकर सर,श्रीमती सिडाम मॕडम ,श्री.गायकवाड, अंगणवाडी सेविका सौ,झोडे मॕडम,सौ.गायकवाड मॕडम सौ.रामटेके मॕडम तथा गावातील स्वयंसेविका  करपते ,आशा वर्कर सौ.गुळदे मॕडम व मेश्राम मॕडम यांनी कार्यक्रमाची यशस्वीकरिता विशेष सहकार्य ,25 दाखलपात्र विद्यार्थी आणि त्यांच्या माता-पालक तसेच सर्व सदस्यगण आणि गावातील महिला-पुरूष युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       
 दरम्यान गावात जणजागृती रॅली काढण्यात आली,तसेच गावातील सर्व नागरिकांना शाळापूर्व तयारी अभियान मेळाव्याची माहिती व्हावी यासाठी शाळेत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.जून मध्ये होणाऱ्या दुसऱ्या मेळाव्याची माहिती देण्यात आली.स्मार्ट मातांची नेमणूक करून त्यांना विकास पत्र देण्यात आले.सोबतच मातांना प्रोत्साहन मिळावा यासाठी शाळेच्या वतीने मातांना सन्मानित करण्यात आले.

मेळाव्यामध्ये एकूण सात स्टॉल लावण्यात आले होते.

यामध्ये 
👇
◼️विकास पत्र,विद्यार्थ्यांची नोंदणी.
◼️शारीरिक विकास.
◼️बौद्धिक विकास.
◼️सामाजिक आणि भावनात्मक विकास.
◼️भाषा विकास.
◼️गणनपूर्व तयारी.
◼️माता-पालकांना साहित्य वाटप व मार्गदर्शन
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
☸️शाळा पूर्व तयारी अभियान शाळा स्तर मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद,विद्यार्थी,गावातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवित सहकार्य केले.
  ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

Share News

copylock

Post Top Ad

-->