पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून होणार 'भव्य कबड्डी स्पर्धा व खेळाडू निवड चाचणी' - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून होणार 'भव्य कबड्डी स्पर्धा व खेळाडू निवड चाचणी'


Vidarbha News India:-
VNImedia:-
पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून होणार 'भव्य कबड्डी स्पर्धा व खेळाडू निवड चाचणी' 

गडचिरोली : जिल्हा हा अतिदुर्गम नक्षलग्रस्त अतिसंवेदनशिल आदिवासी बहुल असून, जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागातील आदिवासी युवक हे होतकरू व विविध कलागुणांनी निपूण आहेत. परंतु त्यांच्या सुप्त कला-गुणांना वाव मिळावा असे कुठलेही साधन जिल्ह्यामध्ये उपलब्ध होत नसल्यामुळे दुर्गम भागातील युवकांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळत नाही. ही बाब लक्षात घेवून त्यांच्या कलागुणांना संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, गडचिरोली पोलीस दलाच्यावतीने मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांच्या संकल्पनेतून 'वीर बाबुराव शेडमाके भव्य कबड्डी स्पर्धा व खेळाडू निवड चाचणी' चे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हाभरातील ७९९० खेळाडूंनी दिनांक १४/०२/२०२२ ते १८/०२/२०२२ या कालावधीत पोस्टे/उपपोस्टे/पोमके स्तरावर व ५८० खेळाडूंनी दिनांक २०/०२/२०२२ ते २५/०२/२०२२ या कालावधीत उपविभागीय स्तरावर स्पर्धेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यामधुनच उपविभागीय स्तरावरील स्पर्धेतील विजेत्या १० संघाकरीता पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे १२० खेळाडूंकरीता दिनांक ०८/०४/२०२२ ते ०१/०४/२०२२ रोजी जिल्हास्तरीय वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धेचे व प्रो कबड्डी लिगमध्ये यु-मुंबा संघासाठी निवड चाचणीचे आयोजन वीर शहीद पांडू आलाम सभागृह, पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे पार पडणार असून, 
सदर स्पर्धेचे यु-ट्युबच्या SP Gadchiroli Police या चॅनलवरील https://youtube.com/channel/UCmd6To5TbsfeCLJ3-BrbdBw लिंकवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. ~ या लिंकवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या १० संघामध्ये होणाऱ्या लढतीमधून अंतिम ३ संघाची निवड प्रथम, द्वितीय व तृतिय क्रमांकाकरीता होणार असून, गडचिरोली पोलीस दलाकडून प्रथम पारितोषीक २५,०००/- रूपये रोख, चषक व प्रमाणपत्र, द्वितीय २०,०००/- रूपये रोख, चषक व प्रमाणपत्र, तृतिय १५,०००/ रूपये रोख, चषक व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट आलराउंडर, उत्कृष्ट डिफेंडर व उत्कृष्ट रिडर अशा खेळाडूंची निवड करण्यात येणार असून, प्रो कबड्डी लिग मध्ये यु-मुंबा संघाच्या प्रशिक्षण शिबीरामध्ये त्यांच्या स्टार खेळाडू सोबत प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. यु-मुंबाचा टिम लिडर संदिप सिंह व यु-मुंबाचा संघाचा उत्कृष्ट खेळाडू अभिषेक सिंह उपस्थित राहून उत्कृष्ट खेळाडूंची निवड करणार आहेत. उद्घाटनिय सामना दिनांक ०८/०४/२०२२ रोजी दुपारी ०३.०० वा सुरु होणार असून,
या कबड्डी स्पर्धेचे थेट प्रक्षेपण यु ट्युबवर लाईव्ह दाखविण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांनी सांगितले आहे. सदर स्पर्धेच्या आयोजनास अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे सा., उपविभागिय पोलीस अधिकारी गडचिरोली प्रणिल गिल्डा सा., पोलीस उपअधिक्षक (अभियान) सुदर्शन राठोड सा., प्रभारी पोलीस उपअधीक्षक, गडचिरोली प्रविण डांगे सा. नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार यांनी अथक परीश्रम घेतले.

Share News

copylock

Post Top Ad

-->