Vidarbha News India:-
VNI:-
पोलीस स्टेशन देवळी जि. वर्धा येथील
सहाय्यक फौजदार यांच्यावर ACB एसीबीची कारवाई
वर्धा : पोलीस स्टेशन देवळी जि. वर्धा येथील सहाय्यक फौजदार सुधीर बापुराव मेंढे वय ५४ वर्ष यांना ३० हजार रूपयांची लाच स्विकारतांना ॲन्टी करप्शन ब्युरो, वर्धा पथकाने रंगेहात पकडले,
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे रा. नंदोरा डफरे ता. देवळी जि. वर्धा येथील रहीवासी असुन त्यांचा शेती व चहाकॅन्टींग चा व्यवसाय आहे. ०५/०५/२०२२ रोजी तक्रारदार व तक्रारदार यांचा लहान भाउ यांचे विरुध्द पोलीस स्टेशन देवळी येथील अप क. ४२७/२२ कलम ३२४ भादवि व्या गुन्हयात गुन्हयात कोणतीही कारवाई न करून व अटक न करणेकरीता आलोसे सुधीर बापुराव मेंढे यांनी ५ हजार रुपयेची लाचेची मागणी केली होती परंतु तकारदार यांची आलोसे यांना लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वर्धा येथे तक्रार नोंदविली.
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून लाच मागणी संबंधाने पडताळणी करण्यात आली असता आलोसे सुधीर बापुराव मेंढे, स. फौ, पोलीस स्टेशन देवळी यांनी तक्रारदार व तकारदार यांचे लहान भाउ यांचे विरुद पोलीस स्टेशन देवळी येथील अप क्र. ४२७/२२ कलम ३२४ भादवी चे गुन्हयात कोणतीही कारवाई न करणे व अटक न करणेकरीता ५ हजार रु लाचेची मागणी करून तडजोडअंती ३ हजार रु पोलीस स्टेशन देवळी जि. वर्धा चे आवारात स्वतः स्विकारल्याने आलोसे सुधीर बापुराव मेंढे, सहाय्यक फौजदार नेमणुक पोस्टे देवळी यांचे विरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारणा अधिनियम २०१८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही राकेश ओला, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर, मधुकर गिते, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात डि. सी. खंडेराव, पोलीस उपअधिक्षक, पोलीस निरिक्षक, संदिप थडवे, पोलीस निरिक्षक सुहासिनी सहस्त्रबुध्दे लाप्रवि वर्धा, सफौ रविन्द्र बावणेर, पोहवा संतोष यावणकुळे, नापोका सागर भोसले, नापोका प्रशांत वैद्य, पोका कैलास वालदे, पोकॉ. प्रदिप कुचनकर, मनापोका अपर्णा गिरजापुरे, चानापोकॉ निलेश महाजन सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वर्धा यांनी यशस्वी कामगिरी केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते, कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणी अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी ईसम लाचेची मागणी करीत असल्यास कृपया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.