महाराष्ट्रातील १३ हत्ती गुजरातला पाठविण्याचा केंद्र शासनाचा निर्णय - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

महाराष्ट्रातील १३ हत्ती गुजरातला पाठविण्याचा केंद्र शासनाचा निर्णय


Vidarbha News India:-
VNI:-
महाराष्ट्रातील १३ हत्ती गुजरातला पाठविण्याचा केंद्र शासनाचा निर्णय 

- राधे क्रिष्ण टेंपल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट चार हत्तींची करणार देखभाल
- स्थानिक गावकऱ्यांना मिळणार रोजगाराच्या संधी
- कमलापूर, पातानील व ताडोबा येथील १३ हत्ती जामनगर येथे पाठविणार केद्र शासनाची मान्यता

नागपूर : ताडोबासह गडचिरोली येथील कमलापूर व पातानील येथील एकूण १३ हत्ती गुजरातमधील जामनगर येथे पाठविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असल्याची माहिती प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) युवराज एस. यांनी कळविले आहे.
राज्यातील बंदिस्त हत्तींच्या उत्तम स्वास्थासाठी व व्यवस्थापनासाठी वन विभाग कटिबध्द आहे. याकरीता विविध तज्ञ व या क्षेत्रातील मान्यताप्राप्त अशासकीय संस्थांचा सहयोग घेण्यात येत आहे.
कमलापूर येथील आठ हत्तींपैकी चार सुदृढ हत्तींसाठी त्यांच्या संपूर्ण जीवनकाळासाठी नवीन सोयी सुविधा राधे क्रिष्ण टेंपल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट यांच्याकडून निर्माण करण्यात येणार आहेत. या ट्रस्टने कमलापूर येथे निर्माण करण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांचे व्यवस्थापन करण्याचे मान्य केले आहे. तसेच या सुविधांच्या निर्मितीसाठी लागणारा सर्व खर्च ट्रस्टकडून करण्याची तयारी दर्शविली असून, त्यासाठी लागणारा खर्चही करण्याचे मान्य केले आहे. यामुळे स्थानिक गावकऱ्यांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
कमलापूर येथील चार सुदृढ हत्तीशिवाय कमलापूर, पातानील व ताडोबा येथील वयोवृध्द, अप्रशिक्षित व लहान पिल्ले अशा एकूण तेरा हत्तींच्या पुढील जीवनकाळातील योग्य स्वास्थ व उच्च दर्जाच्या वैद्यकीय देखरेखीसाठी, प्रशिक्षित व अनुभवी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत उपचाराची सोय व उत्तम आधुनिक सेवा सुनिश्चित करण्यासाठी, राहण्यासाठी प्रशस्त व भरपूर जागा असलेल्या जामनगर स्थित राधे क्रिष्ण टेंपल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट येथे पाठविण्यात येणार आहे. त्यांना यापुढे कोणतेही काम देण्यात येणार नाही किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांचा वापर करण्यात येणार नाही. तसेच प्राणिसंग्रहालयाप्रमाणे कोठेही प्रदर्शितही करण्यात येणार नाही.
वन विभागाने हे हत्ती राधे क्रिष्ण टेंपल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट, जामनगर येथे पाठविण्यासाठी केंद्र शासनाकडून नियमानुसार ना-हरकत पत्र प्राप्त केले आहे. या सर्व हत्तींची आजन्म काळजी ट्रस्टकडून घेण्यात येणार असल्याचे वनसंरक्षक (नियोजन व व्यवस्थापन-वन्यजीव) तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) युवराज एस. यांनी कळविले आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->