गडचिरोली जिल्हा स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटनेची सभा संपन्न !.. - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोली जिल्हा स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटनेची सभा संपन्न !..

Vidarbha News India:-
VNI:-
गडचिरोली जिल्हा स्वतंत्र विद्युत कंत्राटी  कामगार संघटनेची सभा संपन्न !..

गडचिरोली :- जिल्ह्यातील स्वतंत्र विद्युत  कंत्राटी कामगारांची  सर्वसाधारण सभा  दि. १७ मे बुधवार ला  सविधान सभागृह बळीराजा पॅलेस येथे मा.जे.एस.पाटील साहेब (राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र मजदूर युनियन) यांच्या अध्यक्षते खाली सभा संपन्न झाली.
या संघटनेमध्ये गडचिरोली जिल्ह्यात पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली, यामध्ये संघटनेचे अध्यक्ष प्रशांत ढवगाये, उपाध्यक्ष  अमोल फुलझेले, सचिव विवेक खोब्रागडे, सहसचिव ढेमेश्वर अंबादे, कोषाध्यक्ष निनाद भोयर, यांची नियुक्ती करण्यात आली. .
या सभेला मा.प्रशांत रामटेके साहेब (अध्यक्ष गवंडी बांधकाम मजदूर युनियन) , मा.श्री.डि.एम.खैरे (सचिव स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र प्रदेश),  मा. श्री अशोक मस्के साहेब (संघटन अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन चंद्रपूर) मा. नागदेवते साहेब,  मा. शैलेश वाशिमकर (माजी झोनअध्यक्ष:-महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विधुत कर्मचारी संघटना चंद्रपूर) नितीन गौरखेडे साहेब  हे प्रमुख्याने उपस्थित होते. 
   सर्वप्रथम  मा. जे.एस.पाटील साहेबांनी गडचिरोली जिल्ह्यातील विद्युत  क्षेत्रातील  कंत्राटी कामगाराचे समस्या जाणून घेतल्या व त्यावर कशाप्रकारे दूर करण्यासाठी प्रयत्न करावे या करिता सविस्तरपणे माहिती देऊन आपल्याला एकत्रित येऊन संघर्ष करण्याची आवश्यकता आहे हे समजावून सांगितले. तसेच कंत्राटी स्वरूपात काम  करणाऱ्या कामगाराकरिता आंबेडकरी विचारधारेच्या चळवळी नाही आहेत. आणि ज्या कामगार संघटना कार्यरत आहेत त्या संघटना व्यवस्थेच्या पुरस्कर्त्या आहेत.आज या देशात संघटीत व असंघटित क्षेत्रातील  बहुजन समाजातील कामगारावर अन्याय करणारा वर्ग हा ज्या लोकांवरती अन्याय होत आहे त्या लोकांचे नेतृत्व करीत आहेत. अन्याय करणारा हा अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून देवु शकत नाही, पण अन्याय करणाऱ्या च्या फायद्यासाठी वापर करून घेत असतो.आपले नेतृत्व हे राईट डायरेक्शन ने असले पाहिजे. या देशात २८ कामगार संघटना कार्यरत असून त्या डाव्या उजव्या विचारसरणीच्या आहेत. या देशातील संघटीत व असंघटित क्षेत्रातील बहुजन कामगारांच्या भवितव्याचा अविचार करतात. मोठ्या प्रमाणावर बहुजन समाजातील कामगार हा संघटीत व असंघटित क्षेत्रात कार्यरत आहे. पण देश पातळीवर फुले शाहू आंबेडकर यांच्या विचार सरणीची एकही कामगार संघटना कार्यरत नाही.प्रत्येक विभागात कार्यरत असलेल्या कामगार संघटना व नव्याने बांधण्यात येत असलेल्या कामगार संघटना ह्या स्वतंत्र मजदूर युनियन सी स्वलग्न करुन देशपातळीवर स्वतंत्र मजदूर युनियन चे जाळे निर्माण करणे हे आपणा सर्वाचे प्रथम कर्तव्य आहे. ध्येय पुर्ण होत नाही तो पर्यंत आम्ही लढत राहु व आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वी होऊ असे आव्हान केले. 
सभेला मा.प्रशांत रामटेके साहेब, डी. एम.खैरे साहेब, माननीय शैलेश वाशिमकर साहेब मा. अशोक मस्के साहेब, मा. जे.सी रामटेके यांनी आपले मार्गदर्शन केले.
तसेच गडचिरोली  जिल्ह्याकरिता नवीन स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटनेची  कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
या संघटनेच्या कार्यकारणी  सदस्यांची निवड :-
 जितेंद्र नर्नवरे, सुरेश रोहणकर, नितेश निकुरे, अतुल रायपुरे, कू. करिष्मा वाघ.यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारायांचे मा.एस.पाटील साहेब यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीच शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन मा.श्री रवी राऊत गडचिरोली उपविभाग म.रा.मा.वि.क.सं) यांनी केले . या कार्यक्रमाचे नियोजन श्री सुधीर चौधरी विभागीय अध्यक्ष गडचिरोली व सागर मासळकर विभागीय सचिव (म.रा. वि. क. संघटना गडचिरोली) यांनी केले. या कार्यक्रमाला   व मोठ्या प्रमाणावर विद्युत क्षेत्रातील कंत्राटी कामगार बंधू उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Ad

-->