VNI:-
एटापल्ली : नक्षल्यांनी केली वाहनाची जाळपोळ
गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील हालेवारा पोलीस मदत केंद्रांतर्गत मवेली गावाजवळ नक्षल्यांनी ४ वाहनांची जाळपोळ केले असल्याची माहिती प्राप्त झाली असून दोन दिवसाअगोदरच नक्षल्यांनी हालेवारा येथील एका इसमाची हत्या केली होती जिल्ह्यात नक्षल्यांनी पुन्हा डोके वर केल्याचे दिसून येत आहे .
सविस्तर वृत्त असे कि काही महिन्यापूर्वी झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत सेंट्रल कमिटी मेंबर मिलिंद तेलतुंबडेसह २६ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला होता त्यानंतर अनेक दिवस नक्षल घटना झाले नव्हते त्यामुळे नक्षल बॅकफूट गेले असल्याचे बोलल्या जात होते मात्र आता नक्षल्यांनी पुन्हा डोके वर करत अनेक नक्षल कृत्य घडवून आणत आहेत , काही दिवसांपूर्वी भामरागड तालुक्यात पोलिसांवर हल्ला करून एका जवानाला जखमी केले होते दोन दिवसांपूर्वी नक्षल्यांनी हालेवारा येथील एका इसमाची हत्या केली होती तर आज नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील हालेवारा पोलीस मदत केंद्रांतर्गत मवेली गावाजवळ नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील ४ वाहनांची जाळपोळ केले त्यात १ ट्रक १ ट्रॅक्टर २ पोकलेन मशीन्स चा समावेश आहे.