VNI:-
बुद्ध पौर्णिमा माहिती मराठी मध्ये | Buddha Purnima information
बुद्ध पौर्णिमा याच दिवशी गौतम बुद्ध यांचा जन्म झाला आणि त्यांना ज्ञानप्राप्ती सुद्धा याच दिवशी झाली होती. व याच दिवशी बुद्धांचा ( महानिर्वाण ) , मृत्यू झाला होता. या तीन गोष्टी याच वैशाख पौर्णिमेला घडल्या होत्या म्हणून ही तिथी वर्षातील येणार्या सगळ्या तिथे मध्ये पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते आणि त्याच बरोबर हिंदू धर्मामध्ये या पौर्णिमेला सत्यविनायक पौर्णिमा असेही म्हणतात .
बुद्ध जयंती चे महत्व | Importance of Buddha Jayanti
जगातील दुःख कसे नाहीसे होईल व दुःख का होते याच्या शोधात गौतम बुद्धांनी खूप सारे निरनिराळे मार्ग अनुसरण केले त्यासाठी त्यांनी स्वतःचा संसार त्यागून ध्यान आणि तपश्चर्येचा मार्ग स्वीकारला .
गौतम बुद्ध यांना जगाचे व जग कशा तऱ्हेने चालते याचे अबाधित सत्य व या बाबतीतले ज्ञान हे बोध वृक्षाखाली प्राप्त झाले .
म्हणजे याच दिवशी बुद्धांना चार आर्य सत्यांचा साक्षात्कार झाला व त्यांचा जन्म आणि मृत्यू याच दिवशी झाले यामुळे त्यांना ज्ञानाबरोबरच दुःख नाहीसे करण्याचे कारण ही समजले अशा बऱ्याच गोष्टी या एकाच दिवशी घडल्या म्हणून बुद्ध जयंतीला खूप महत्त्व आहे .
गौतम बुद्ध यांची माहिती | About Buddha In
गौतम बुद्ध कोण होते ? त्यांना बुद्ध नाव कसे पडले ? या प्रश्नांबद्दल जाणून घेऊयात .
गौतम बुद्ध हे इक्ष्वाकु क्षत्रिय शाक्य कुळ चे राजा शुद्धोधन यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म 563 ईसा पूर्व मध्ये लुंबिनी च्या कपिल वास्तु म्हणजेच आताचे नेपाळ मध्ये झाला होता .
आणि त्यांचे नाव सिद्धार्थ महाराज असे होते व त्यांच्या आईचे नाव महामया असे होते. व सिद्धार्थ महाराज यांच्या जन्मानंतर सात दिवसात त्यांच्या आईचे निधन झाले.त्यानंतर त्यांचा सांभाळ महाराणीच्या छोट्या बहिणीने म्हणजे महाप्रजापती गौतमी यांनी केला.
16 वर्षाचे असतांना त्यांचा विवाह यशोधरा नावाच्या मुलीशी झाला. त्यानंतर त्यांना मुलगा झाला त्याचे नाव राहुल असे असे होते .सिद्धार्थाच्या वडिलांची इच्छा होती की तो एक महान राजा व्हावा.परंतु संसारीक जीवनात आल्यानंतर त्यांना लोकांचे दुःख बघवत नव्हते.
त्यात त्यांनी बऱ्याच अशा घटना घडतानी बघितल्या की ज्यामुळे त्यांना दुःख का होते, त्यामागचे सत्य काय, त्या पासून कशी सुटका करावी व इतर बऱ्याच प्रश्नांच्या शोधात त्यांनी संसार त्यागून 29 व्या वर्षी घरदार सोडून जंगलात गेले .
सत्य शोधत असताना त्यांनी बरीच भ्रमंती केली व गया नावाच्या ठिकाणी ते पोहोचले. व तिथे असलेल्या बोधीवृक्ष नावाच्या झाडाखाली ते ध्यान करण्यास बसले आणि तिथेच त्यांना ज्ञानप्राप्ती झाली .त्यानंतर त्यांनी लोकांना वास्तविक जीवन ( ज्ञान ) याबद्दल माहिती दिली .
बुद्धांचे चार सिद्धांत | आर्य सत्याचा सिद्धांत
ज्यात त्यांनी दुःख आणि त्यांची कारणे यांच्याबद्दल सांगितले आहे .
१)माणूस ( प्राणी) हा आपल्या संपूर्ण जन्माच्या काळात दुःखाच्या अवतीभवती (साखळीत) राहतो. हे दुःख म्हणजेच “महान सत्य” आहे.
२)जगातल्या वस्तूंची तळमळ ( लालसा ) हेच समाजाचे खरे सत्य आहे. हे दुःख उदात्त सत्य आहे .
(लालसा), तृष्णाने मरणारा मनुष्य आपल्या प्रेरणेने पुन्हा जन्म घेतो याच समुदायाला आर्यसत्य म्हणतात .
३)लालसा ( तृष्णा ) चा तोल थांबविणे हे एक उदात्त सत्य आहे. लालसा नसल्यामुळे जगातील गोष्टींमुळे दुःख होत नाही किंवा माणसाचा मृत्यूनंतर त्याचा पुनर्जन्म होत नाही हे एक दुःख निवारण चे सत्य आहे.
४)विणलेल्या दिव्याप्रमाणे माणूस हा मोक्ष प्राप्त करतो आणि या समाप्तीच्या जाणाऱ्या मार्गालाच आर्य सत्य म्हणतात. या मार्गात आठ दृष्ट्या आहेत .
योग्य दृष्टी, योग्य इच्छा, योग्य भाषण, योग्य कृती, योग्य उदरनिर्वाह, योग्य व्यायाम, योग्य स्मरणशक्ती आणि योग्य समाधी. हा आर्य मार्ग प्राप्त केल्यानंतर तो मनुष्य मुक्त होतो.
बुद्ध नाव कसे पडले? | How Sidharth Became Gautam Buddha?
गौतम बुद्ध ज्या सत्याच्या शोधात निघाले होते ते सत्य त्यांना मिळत नव्हते .त्यांनी खूप भटकंती केली साधून कडून ,गुरूंकडून ज्ञान घेतले तरी त्यांना जे सत्य आहे ते मिळत नव्हते .
त्यांनी खुप कठिन तपस्या केली, अन्नपाणी वर्ज केले. त्यांच्याकडे बघून महापुरुषांचे सारखे काहीच लक्षणे दिसत नव्हती .आणि एक दिवस ते अशक्तपणामुळे चक्कर येऊन पडले. मग त्यांनी विचार केला की शरीर सुकवून मला काय मिळाले म्हणून त्यांनी पुन्हा भिक्षा मागून अन्न खाण्यास सुरुवात केली.
वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्ध बोधीवृक्षाखाली बसले होते. तिथेच जवळ एक गाव होते त्या गावातील सुजाता नावाच्या एका महिलेने त्यांच्यासाठी खीर आणली .ती खीर खाऊन बुद्धाच्या शरीरात ताकद आली.
त्यानंतर बुद्धांनी प्रण केला की जोवर मला ज्ञान प्राप्ती होत नाही तोवर मी काही तपस्या यातून उठणार नाही आणि ते समाधीत बसले.
त्यानंतर त्यांना खरे ज्ञान प्राप्त झाले त्यानंतर त्या सिद्धार्थाचे गौतम बुद्ध झाले ( बुद्ध ) या शब्दाचा अर्थ ज्ञान प्राप्त होणे म्हणजे बोध असणे असा आहे .