महिला वनकर्मचारी व पोलिसांना मारहाण - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

महिला वनकर्मचारी व पोलिसांना मारहाण

Vidarbha News India:-
VNI:-
महिला वनकर्मचारी व पोलिसांना मारहाण 
गडचिरोली :-
मुलचेरा-आष्टी : जंगलाच्या जागेवर केलेेले अतिक्रमण काढल्यानंतर त्या ठिकाणी राेपवन करण्यासाठी गेलेल्या महिला वनकर्मचारी तसेच साेबत गेलेल्या महिला पाेलीस कर्मचाऱ्यांना अतिक्रमणधारकांनी मारहाण केल्याची घटना विजयनगर येथे २८ मे राेजी घडली.
वनपरिक्षेत्र मार्कंडा (कं) अंतर्गत येणाऱ्या नियात क्षेत्र गुंडापल्ली मधील राखीव वनक्षेत्रात विजयनगर येथील ९ अतिक्रमणधारकांनी एकूण ११.१८७ हेक्टर वनजमिनीवर केलेले अवैध अतिक्रमण केले. हे अतिक्रमण दिनांक ३० मार्च रोजी वनविभाग, महसूल विभाग, आणि पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने हटविण्यात आले. या ठिकाणी राेपवन लावण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. अतिक्रमणाबाबतची कागदपत्रे सादर करण्याबाबत १७ एप्रिल पर्यंत मुदत दिली हाेती.
मात्र त्यांनी कागदपत्रे सादर केली नाही. तसेच यापूर्वीही राेपवन लावण्याचा प्रयत्न केला असता अतिक्रमणधारकांनी विराेध केला. २८ मे रोजी पुन्हा राेपवन लावण्यासाठी वनकर्मचारी गेले असता विजयनगर गावातील काही महिलांनी विराेध केला. या महिलांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मार्कंडाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत यांनी दिली आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->